Goa Job Scam Dainik Gomantak
गोवा

Goa Jobs: दिशाभूल! 126 उमेदवारांना नोकरीची नियुक्तीपत्रे; त्‍यात दोघेच गोमंतकीय!

‘कोकणी’च्या जुजबी ज्ञानावर परराज्‍यांतील उमेदवारांकडून अटपूर्ती

दैनिक गोमन्तक

राजधानी पणजी येथे सोमवारी झालेल्‍या केंद्र सरकारच्‍या महत्त्वाकांक्षी रोजगार मेळाव्‍यात १२६ उमेदवारांना नियुक्‍तीपत्रे देण्‍यात आली, परंतु त्‍यातील केवळ दोघेच गोमंतकीय; तर उर्वरित उमेदवार कॅसलरॉक (कर्नाटक) व महाराष्‍ट्रातील असल्‍याची धक्‍कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्‍हणजे, राज्‍यातील तरुणांनाच नोकऱ्या मिळाल्‍याच्‍या आविर्भावात केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांनी मेळाव्‍यात केलेल्‍या संबोधनामुळे आश्‍‍चर्य व्‍यक्‍त होत आहे.

मोदी सरकारच्‍या सहाव्या रोजगार मेळाव्याचे आयोजन देशातील २०हून अधिक राज्यांमध्ये ४५ ठिकाणी करण्‍यात आले होते. त्‍याअंतर्गत सुमारे ७० हजार तरुणांना नियुक्‍तीपत्रे दिल्‍याचा दावा करण्‍यात आला आहे. राज्‍यात हा मेळावा पणजीतील ‘मिनेझिस ब्रागांझा’ सभागृहात झाला. केंद्रीयमंत्री श्रीपाद नाईक यांच्‍या हस्‍ते १२६ उमेदवारांना नियुक्‍ती पत्रे देण्‍यात आली.

त्‍यात भारतीय स्टेट बँक ६४, बँक ऑफ महाराष्ट्र १४, रेल्वे ३०, सीमाशुल्क ८, केंद्रीय वस्तू व सेवा कर विभाग ८, तर केंद्रीय श्रम मंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयात प्रत्‍येकी एकाला संधी मिळाली. मेळाव्‍यातून गोमंतकीयांनाच ह्या नोकऱ्या मिळाल्‍या, असे भासविण्‍यात आले; परंतु उपलब्‍ध माहितीनुसार १२६ पैकी केवळ दोघेच गोवेकर असून ते साखळी येथील आहेत. पैकी एकजण अभियंता आहे.

गोव्‍यात डामडौल कशासाठी?

  • केंद्र सरकारच्‍या अखत्यारीतील नोकरभरती असली तरी अपवाद वगळता त्‍यात राज्‍यांना अग्रक्रमाने प्राधान्‍य देण्‍यात येते. गोव्‍यात भरती प्रक्रिया होत असताना संबंधित उमेदवाराला कोकणी भाषेचे ज्ञान अनिवार्य ठरते.

  • प्रत्‍यक्षात २ गोमंतकीय उमेदवार वगळता नियुक्‍तीपत्रे मिळालेल्‍या १२४ जणांनी जुजबी कोकणीचे ज्ञान मिळवून स्‍थानिक भाषेची अटपूर्ती केली आहे, जी भविष्‍यात आक्षेपार्ह ठरू शकते.

  • बहुसंख्‍य नियुक्‍त उमेदवार अन्‍य राज्‍यांतील होते तर रोजगार मेळाव्‍याचा गोव्‍यात डामडौल कशासाठी, असा प्रश्‍‍न उपस्‍थित केला जात आहे. गोमंतकीयांची दिशाभूल करण्‍याचाच हा प्रकार ठरतो.

भाजप ही इव्‍हेन्‍ट मॅनेजमेंट कंपनी आहे. त्‍यांना गोमंतकीयांप्रति स्‍वारस्‍य नाही. रोजगार मेळाव्‍याच्‍या नावाने गोव्‍यातील सत्ताधारी नेते सामान्‍यांची दिशाभूल करत असतील ते खचितच योग्‍य नाही. सरकारी नोकऱ्यांमध्‍ये गोमंतकीयांचा हक्‍क डावलला जात असेल तर ते सहन केले जाणार नाही.

- अमित पाटकर, काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT