Goa Illegal Borewells Dainik Gomantak
गोवा

Goa Illegal Borewells: हायकोर्टाचा बडगा पण प्रशासनाची सुस्ती? गोव्यात अजूनही 121 बेकायदा बोअरवेल्समधून पाण्याचा उपसा सुरुच

Illegal borewells in Goa latest update: राज्‍यात एकूण २२८ कुपनलिका आणि १७१ विहिरी बेकायदेशीररीत्‍या सुरू होत्‍या. त्‍यातील १८३ कुपनलिका, विहिरी गेल्‍या काही वर्षांत नियमित करण्‍यात आल्‍या

दैनिक गोमन्तक डिजिटल

पणजी: उच्च न्‍यायालयाच्‍या आदेशानुसार जलस्रोत खात्‍याने राज्‍यातील विविध भागांमधील बेकायदा कुपनलिका सील करण्‍याची मोहीम सुरू केली असली तरी अजून १२१ कुपनलिका आणि विहिरी बेकायदेशीररीत्‍या सुरू असल्‍याची माहिती जलस्रोत खात्‍याच्‍या सूत्रांनी ‘गोमन्‍तक’शी बोलताना दिली.

राज्‍यात एकूण २२८ कुपनलिका आणि १७१ विहिरी बेकायदेशीररीत्‍या सुरू होत्‍या. त्‍यातील १८३ कुपनलिका, विहिरी गेल्‍या काही वर्षांत नियमित करण्‍यात आल्‍या. त्‍यानंतर पहिल्‍या टप्‍प्‍यात ६८ कुपनलिका आणि विहिरी सील करण्‍यात आल्‍या होत्‍या. उच्च न्‍यायालयाच्‍या आदेशानुसार काहीच महिन्‍यांपूर्वी आणखी २७ कुपनलिका सील करण्‍यातआल्‍या.

त्‍यामुळे त्‍यांची संख्‍या ९५ इतकी झाली आहे. १४ कुपनलिकांचे अहवाल भूजल विकास विभागाला पाठवण्‍यात आले असून, आतापर्यंत २५२ कुपनलिका आणि विहिरींना ‘कारणे दाखवा’ नोटीसा जारी करण्‍यात आलेल्‍या आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

बेकायदेशीररीत्‍या सुरू असलेल्‍या कुपनलिकांमध्‍ये राज्‍याच्‍या भूजल पातळीत घट झालेली आहे. शिवाय त्‍यांच्‍यामुळे जवळच्‍या विहिरींमधील पाणीही कमी झालेले आहे. त्‍याचा फटका सध्‍या राज्‍यातील विविध भागांतील नागरिकांना सहन करावा लागत आहे.

कारवाईची सद्य:स्थिती

l एकूण बेकायदा कुपनलिका व विहिरी : २२८ कुपनलिका + १७१ विहिरी

l आतापर्यंत नियमित केल्या : १८३l पहिल्या टप्प्यात सील केलेल्या : ६८

l उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सील केलेल्या : २७l एकूण सील केलेल्या : ९५

l कारणे दाखवा नोटीस : २५२ कुपनलिका-विहिरीl भूजल विभागाकडे पाठवलेले अहवाल : १४

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT