Virgin mother Dainik Gomantak
गोवा

चिंताजनक : गोव्यात प्रतिवर्षी 12 मुली कुमारी माता

लैंगिक शिक्षणाअभावी आकडा वाढण्याची शक्यता

दैनिक गोमन्तक

मुंबई : गोवा राज्य देशात साक्षरतेच्या दृष्टीने देशात 11 व्या स्थानावर असून गोव्याची साक्षरता 88.70 टक्के आहे. तर राज्याला देशात पर्यटन आणि अर्थिकदृष्ट्या ही महत्त्वाचं स्थान आहे. मात्र मिळालेल्या माहितीनूसार गोव्यात प्रतिवर्षी 12 मुली कुमारी माता होत असल्याची चिंताजनक बाब समोर आली आहे. (12 virgin mothers in Goa every year )

त्यामुळे प्रसूतीतज्ज्ञ आणि स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. श्रद्धा पाटील यांनी लैंगिक शिक्षण शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याची आवश्यक असल्याचं म्हटलं आहे.तसेच लैंगिक शिक्षणाअभावी हा आकडा वाढण्याची शक्यता भीती ही तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

अल्पवयीन युवा वर्गाकडून असुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्यास भविष्यात प्रौढ वयात गर्भधारणा करत असताना मुलीला प्रजनन क्षेत्रात संसर्ग किंवा अडचणी येऊ शकतात. किशोरवयीन मुलीने गर्भपात केल्यानंतर वंध्यत्वाची शक्यता नाकारता येत नाही. तसेच लैंगिक संबंधांमुळे संसर्गजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याचीही शक्यता असल्याच मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

प्रतिष्ठेच्या चिंतेपायी अनेकदा पालक खासगी रुग्णालयात मुलींना दाखल करतात आणि गर्भपात घडवून आणतात. खरेतर अशी प्रकरणे गोवा बालके कायद्यांतर्गत बलात्कार म्हणून गणली जातात. पालक आणि डॉक्टर यांच्यातील परस्पर सामंजस्याने ही प्रकरणे दडवली जातात. लैंगिक संबंधांसाठी जबरदस्ती करण्यात आली नसेल तर तो कायद्यानुसार बलात्कार ठरतो.मात्र पालकांना याबाबत कुठेही वाच्यता करण्याची इच्छा नसल्याने संबंधित मुलाबाबत तक्रार केली जात नाही, असे एका स्त्रीरोगतज्ज्ञाने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT