कोंब मडगाव येथील गटार वाहिनी दुरुस्ती कामाला सुरुवात

माजी नगरसेवक केतन कुरतरकर यांच्याकडून मंत्र्यांचे आभार
Pipeline Repair
Pipeline RepairDainik GOmantak
Published on
Updated on

मडगाव : कोंब मडगाव परिसरात गेले कित्येक दिवस नादुरुस्त गटार वाहिनीमुळे परिसरातील नागरिक, पादचारी यांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. ही गटार वाहिनी नागरिभागात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा ही प्रश्न निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर नादुरुस्त पाईप बदलून ती मुख्य सांडपाणी वहिनीला जोडण्याचे काम सुरू करण्यात आले असून हे काम पूर्ण झाल्यावर कोंबवासीयांना दुर्गंधी पासून कायमची मुक्ती मिळणार आहे.(Gutter repair work started at Komb Madgaon )

Pipeline Repair
तृणमूल काँग्रेसला खिंडार, किरण कांदोळकरांसह कार्यकर्त्यांचा राजीनामा

चार दिवसांपूर्वी या कामाला सुरुवात झाली असून लवकरच ते पूर्ण होणार अशी माहिती या प्रभागाचे माजी नगरसेवक केतन कुरतरकर यांनी दिली. यावर बोलताना कुरतरकर म्हणाले, ही वाहिनी परत परत चोंदून आतील दुर्गंधीयुक्त पाणी बाहेर वाहत असे. त्यामुळे लोकांना असह्य अशी दुर्गंधी सोसावी लागत असे. आपण सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल यांची भेट घेऊन त्यांना लोकांना होत असलेल्या त्रासांची माहिती करून दिली.

Pipeline Repair
लोकसभेच्या दोन्ही जागांवर काँग्रेसचं लक्ष, भाजप विरोधी जनतेत खदखद

याची दखल घेत काब्राल यांना ही पाईप तातडीने बदलण्याची गरज असल्याचे पटवून दिल्याने त्यांनी प्राधान्याने हे काम हाती घेतले. त्यासाठी आम्ही त्यांचे आभारी आहोत असे ते म्हणाले. यापूर्वी कित्येकांनी आपण गटार वाहिनीचे काम पूर्ण केले असे सांगून स्वतःला श्रेय घेण्याचा प्रयत्न केला मात्र खरी समस्या दूर करण्याचे कुणी प्रयत्न केलेच नाहीत. मात्र काब्रालमुळे ही समस्या आता सुटणार अशी प्रतिक्रिया कुरतरकर यांनी व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com