goa hsc result 2024  Dainik Gomantak
गोवा

12 th Result Goa : ऊहापोह बारावीच्या कमी निकालाचा; शिक्षक म्‍हणतात, आम्‍हाला दोष देऊ नका

12 th Result Goa : निकाल कमी व जास्त लागला तर त्याचे श्रेय बऱ्याच ठिकाणी शिक्षकांना दिले जाते. यामुळेच निकालाच्या टक्केवारीला शिक्षक खरेच जबाबदार असतात का, हा प्रश्‍न टाळला जाऊ शकत नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

मिलिंद म्हाडगुत

12 th Result Goa :

फोंडा, यंदाचा बारावीचा निकाल तुलनेने कमी लागल्यामुळे तो सध्या राज्याच्या शिक्षणक्षेत्रात एक चर्चेचा विषय बनला आहे.

बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने एक महत्त्वाचा टप्‍पा मानला जातो. ही परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरच विद्यार्थी आपल्या आवडीच्या क्षेत्राकडे वळू शकतात. त्यामुळे या परीक्षेच्या निकालाकडे पालकांबरोबरच शिक्षण क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेले असते. गेल्या काही वर्षांची सरासरी पाहता यंदाचा निकाल तुलनेने कमी लागलेला दिसून येतो.

पण, सुरुवातीच्या काळातील ‘ट्रेंड’ पाहिल्यास हा निकाल समाधानकारक मानला जाऊ शकतो. तरीही गेल्या काही वर्षांच्या तुलनेने यंदाचा निकाल का कमी लागला यावर बराच ऊहापोह सुरू झाला आहे.

निकाल कमी व जास्त लागला तर त्याचे श्रेय बऱ्याच ठिकाणी शिक्षकांना दिले जाते. यामुळेच निकालाच्या टक्केवारीला शिक्षक खरेच जबाबदार असतात का, हा प्रश्‍न टाळला जाऊ शकत नाही. काहींनी या निकालाकरिता मोबाईलला जबाबदार धरले असले तरी मोबाईल हा काही यंदाच अस्तित्वात आलेला नाही.

गेली कित्येक वर्षे मोबाईलचा वापर होत असूनसुध्दा निकाल चांगल्याप्रकारे लागलेला दिसून येत होता. यामुळे या तुलनेने कमी लागलेल्या निकालाचे नेमका अन्वयार्थ काय यावर पालक शिक्षणतज्ज्ञ तसेच व्यवस्थापनाचे आकलन घेण्याचे काम सुरू झाले आहे.

पण, सारासार विचार करता मागील बॅचची मुले ही कोविड काळात दहावी परीक्षा उत्तीर्ण झाली होती हे विसरता कामा नये आणि त्यावेळी परीक्षा घेण्याची पद्धत वेगळी असल्यामुळे त्याचा परिणाम या बारावीच्या निकालावर झाला असल्याचे मत काही शिक्षणतज्ज्ञांनी व्यक्त केले.

काही शिक्षकांच्या मते, अभ्यास करण्याची प्रवृत्ती कमी झाल्यामुळे निकालात फरक पडला आहे. तर काही निकालावर समाधान व्यक्त करताना दिसत असून मागील काही वर्षांचे निकाल म्हणजे बेडकाचा फुगून केलेला हत्ती होता, अशी प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.

बुद्धिमत्तेत फरक

यंदाचा निकाल कमी लागला अशी जी ओरड सुरू आहे, ती काही प्रमाणात निरर्थक वाटते. ८४ टक्के हे कमी नाहीत. म्हणूनच गेल्या काही वर्षांच्या तुलनेने यंदाचा निकाल कमी असला तरी त्याचा एवढा बाऊ करण्याचे कारण नाही. प्रत्येक बॅचचा आय क्यू हा वेगवेगळा असतो. एखाद्या बॅचची बुद्धिमत्ता चांगली असली तर निकालही चांगला लागतो.

त्यात परत ही बॅच कोविड काळातील असल्यामुळे त्याचा थोडाफार परिणाम जाणवू शकतो. पण हा फरक तत्कालीन ठरणार हे निश्‍चित. पुढील वर्षी परत चांगला निकाल लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिक्षक तेच असल्यामुळे निकालातल्या भरती-ओहोटीला त्यांना जबाबदार धरले जाऊ नये.

आमच्या वेळचे दहावी-बारावीचे निकाल पाहिले तर यंदाचा निकाल समाधानकारकच म्हणावा लागेल. पण, आता लोकांना ९०-९५ टक्के निकालाची सवय झाल्यामुळे यंदाचा निकाल कमी वाटायला लागला आहे. पण, विद्यार्थ्यांना थोडे तावून सुलाखून घेणे आवश्‍यक असते. आमच्यावेळी ७५ टक्के निकाल लागला तरी फार चांगला निकाल लागला, असे म्हटले जात असे.

त्यामानाने यंदाचा निकाल फारच चांगला आहे. आता या निकालाचे मूल्यमापन केल्यास जी काही कमी आहे ती दोन वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या कोविडमुळे झाली असल्याची शक्यता दिसत आहे. पण त्याचा अर्थ दोरीला साप म्हणून बडवावे असा होत नाही.

- राम कुंकळकर, निवृत्त मुख्याध्यापक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT