भारतीय हवामान विभागाने (IMD) गोव्यात (Goa) 'येलो अॅलर्ट' चा इशारा दिला आहे.  Dainik Gomantak
गोवा

यंदाच्या वर्षात गोव्यात 12 महिने पाऊस, राज्याला पुन्हा 'येलो अॅलर्ट' इशारा

वातावरणात झालेल्या बदलामुळे सध्या वर्षातील 10-11 महिने पाऊस (Rain) पडताना आपल्याला दिसत आहे. परंतु वर्षातील 12 महिने पाऊस पडल्याचे चित्र दुर्मिळ आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: पूर्व मध्य अरबी समुद्रात (Arabian Sea) चक्रीवादळ (Cyclone) आल्याने, भारतीय हवामान विभागाने (IMD) गोव्यात (Goa) 'येलो अॅलर्ट' चा इशारा दिला आहे. यामुळे गोव्याच्या काही भागात पावसाची (Rain) शक्यता आहे.

वातावरणात झालेल्या बदलामुळे सध्या वर्षातील 10-11 महिने पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे. परंतु वर्षातील 12 महिने पाऊस पडल्याचे चित्र दुर्मिळ आहे. मार्चपासून सुरू होणारा मान्सूनपूर्व हंगाम, त्यानंतर सप्टेंबरपर्यंत मान्सूनचा हंगाम आणि ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये मान्सूननंतरच्या हंगामात पावसाची क्रिया अपेक्षित असते. या संपूर्ण वर्षात अंतर्गत बदलांमुळे जानेवारी, फेब्रुवारीसह 12 महिने पावसाची नोंद झाली आहे. IMD चे संशोधक राहुल एम म्हणाले गोव्यात वर्षभर पाऊस पडला.

आयएमडीने राज्याच्या काही भागात आणखी काही दिवस पावसाचा अंदाज वर्तवला आहे. मात्र, येत्या काही दिवसांत पावसाचा जोर कमी होईल. 5 डिसेंबरपासून हवामान सामान्य राहण्याची शक्यता आहे. पुढील तीन ते चार दिवसांच्या कालावधीत किमान तापमानात आणखी दोन अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. किमान तापमान 20 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: खाकी वर्दीचा धाक दाखवून वृद्धांना लुटायचे, डिचोलीत तोतया पोलिसांच्या टोळीचा पर्दाफाश! दोघे अटकेत

Ruturaj Gaikwad Century: ऋतुराज गायकवाडचं वादळ! गोव्याविरुद्ध झळकावलं शानदार शतक; बनला 'विजय हजारे ट्रॉफी'चा नवा 'सेंच्युरी किंग'

झारखंड दारु घोटाळा! छत्तीसगडच्या मद्य व्यावसायिक नवीन केडियाला गोव्यातून अटक; ACB ची कारवाई

"26 वर्षे देशाची सेवा केली, आता ओळख विचारताय?" निवडणूक आयोगाच्या नोटिसमुळे खासदार विरियातो संतापले

WPL 2026: गोमंतकीय क्रिकेटरचा ‘डब्ल्यूपीएल’मध्ये कल्ला! दिल्ली कॅपिटल्सला ठोकला रामराम; यूपी वॉरियर्ससोबत नवीन इनिंग

SCROLL FOR NEXT