11th Tribal Festival celebrated in Goa Dainik Gomantak
गोवा

11वा आदिवासी महोत्सव आंबावली केपेत पूर्वपरंपरेच्या रंगात साजरा

साधारण 20 गुणुले 40 मीटरचा हा मंडप, त्या कामात अजूनही वाकब्‌गार असलेल्या स्थानिक लोकांकडूनच उभारला गेला होता.

दैनिक गोमन्तक

2021 साली प्राथमिक स्वरूपावर सुरू झालेल्या आदिवासी महोत्सवाने आता अधिक उत्साही स्वरूप धारण केले आहे. यंदाचा 11वा आदिवासी महोत्सव आंबावली केपे येथे आपल्या पूर्वपरंपरेचे रंग घेऊन उत्साहाने पार पडला. शनिवार-रविवार असे दोन दिवस चाललेल्या या उत्सवासाठी खास माडांच्या चुडतांनी (झापांनी) बनवलेला मंडप उभारण्यात आला होता. पूर्वीच्या काळी समारंभांसाठी उभारण्यात येणाऱ्या मंडपाला अशाप्रकारचे चुडतांचे छप्पर असायचे. मात्र अलीकडच्या काळात अशातऱ्हेचे मंडप क्वचितच पाहायला मिळतात. साधारण 20 गुणुले 40 मीटरचा हा मंडप, त्या कामात अजूनही वाकब्‌गार असलेल्या स्थानिक लोकांकडूनच उभारला गेला होता. (Tribal Festival celebrated in Goa)

या महोत्सवात भाग घेणारे कलाकार मुख्यतः सांगे, केपे, सासष्टी आणि काणकोण या भागातले होते. अतिशय साधी असणारी मानवी कौशल्ये, मात्र जी आता हळूहळू विरळ होत चालली आहेत, अशांचे दर्शन या महोत्सवात विविध स्पर्धांच्या रूपात घडले. माडांच्या चुडतांच्या ‘हिरां’पासून झाडू विणणे, भात किंवा नाचणीच्या गवताची ‘निवणी’ (जी माथ्यावरच्या भांड्यांचा तोल सांभाळतात) बनवणे, फुलांची फाती (वेणी) तयार करणे, चुडतांची ‘मल्लां’ शिवणे हे प्रकार आपल्या संस्कृतीचे, अगदी अलीकडच्या काळातले निकटचे भाग असूनसुद्धा आज झपाट्याने बदलणाऱ्या व्यवस्थेत दुर्मिळ होत चालले आहे.

आदिवासी स्वयंपाकघरात कधीकाळी अनिवार्य पाककृती असलेल्या असलेली ‘सोजी’ साऱ्यांनी या महोत्सवात चाखली. नेवऱ्यो, सान्ना वगैरे खाद्यपदार्थही प्रदर्शनात हजर होते. ‘मीटांनी खेळप’ (आट्यापाट्या), लगोऱ्या, मठ्ठा फोडणे, विटी-दांडू यासारखे खेळही या महोत्सवाचा भाग होते. त्याशिवाय विविध आदिवासी लोककलांचे सादरीकरणही या महोत्सवात झाले. अशा प्रकारचे महोत्सव महत्त्वाचे का असतात तर त्यातून आपल्या पूर्वकालीन पिढ्यांनी जपलेल्य ज्ञानाचे दर्शन घडते व ते संवर्धित व्हायलाही एक प्रकारे मदत होते. येणाऱ्या नव्या पिढीला या साऱ्या वारसांची तोंडओळख जरी असली तरी त्यातील ‘आपलेपणा’ कळण्यासाठी असे महोत्सव मदत करतात.

मानवी श्रम संस्कृतीशी जुळलेल्या अनेक वस्तू प्रदर्शनात मांडल्या गेल्या होत्या. नांगर, बैलांच्या मानेवरचे जू, वेगवेगळी पुरातन भांडी, घुमट इत्यादी वस्तू आपल्या कृषी परंपरेची साक्ष देत होत्या.

-ख्रिस्तानंद पेडणेकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Colvale Jail: ड्रग्ज, दरोड्यांचे कट अन् कारागृहातील मृत्यू; कोलवाळच्या भिंतीआड दडलंय काय? धक्कादायक वास्तवानं खळबळ

Goa Congress: वरवरची मलमपट्टी नको, मुळावर उपचार हवा! खर्गे आले, एकीचा संदेश दिला; पण काँग्रेसची अंतर्गत गटबाजी संपणार कधी?

Goa Politics: 'भाजपला हरवण्याआधी काँग्रेसने स्वतः एकवटावे', खर्गेंच्या आवाहनावर सरदेसाईंचा पलटवार; पक्षांतराची भीती

Goa Assembly Election 2027:'एकत्र लढू, एकत्र जिंकू'; गोवा विधानसभा निवडणुकीआधी खर्गेंचा काँग्रेस नेत्यांना विजयमंत्र

World Record: 1383 ध्वजांनी रचला इतिहास, न्यू जर्सीत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! FIA कडून जागतिक विक्रमाची नोंद

SCROLL FOR NEXT