Kineco Kaman Composite Structure  Dainik Gomantak
गोवा

Goa Kineco ला चेन्नई इंटिग्रल कोच फॅक्टरीकडून 113 कोटींची ऑर्डर!

Kineco ला गेल्या वर्षी कायनेकोला अशीच 68 ट्रेन्स फ्रंटची ऑर्डर मिळाली होती.

दैनिक गोमन्तक

Kineco Kaman Composite Structure: कंपोझिट तंत्रज्ञान क्षेत्रातील एक अग्रणी कंपनी असलेल्या गोव्याच्या कायनेको लिमिटेडला प्रतिष्ठेच्या अशा ‘वंदे भारत’ सेमी हायस्पीड ट्रेन्‍स Semi High Speed Trains अंतर्गत मॉड्युलर भागांचा पुरवठा आणि उभारणी करण्याच्या 113 कोटींच्‍या कामाची ऑर्डर मिळाली आहे. चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीकडून कायनेकोला ही ऑर्डर मिळाली असल्याची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे देण्यात आली आहे.

यापूर्वी गेल्या वर्षी कायनेकोला अशीच 68 ट्रेन्स फ्रंटची ऑर्डर मिळाली होती. यामुळे रेल्‍वेच्या अंतर्गत भागांचा सर्वाधिक पुरवठा करणारी कंपनी म्‍हणून कायनेकोला प्राधान्‍य मिळणार आहे. ‘वंदे भारत’ या सेमी हायस्पीड रेल्‍वेची निर्मिती पेरुंबुदूर चेन्नई येथील इंटिग्रल कोच फॅक्टरीत भारत सरकारच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाखाली करण्यात येते.

अधिक मजबूत व कौशल्यासह या गाड्या प्रवाशांना अधिक आरामदायीपणा प्रवासाचा अनुभव देतात. तर, कायनेकोच्या संचालक मंडळाचे चेअरमन आदित्य रेड्डी यांनी या महत्वपूर्ण ऑर्डरबद्दल आपण कंपनीच्‍या सर्व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करीत असल्याचे सांगितले.

शेखर सरदेसाई, कायनेको कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक-

‘मेक इन इंडिया’ यशोगाथेचा भाग बनण्याची संधी लाभल्याबद्दल समाधान वाटतेय. गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय रेल्वेच्या आधुनिकीकरणात कायनेको कंपनी आघाडीवर आहे. आता नव्या ऑर्डरमुळे आम्हाला आमच्याकडे असलेल्या अद्ययावत तंत्रज्ञानाच्या साहाय्याने जागतिक दर्जाचे उत्पादन प्रदर्शित करण्याची संधी मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

EPFO Advance New Rules: आजारपण, लग्न, शिक्षण अन् घरासाठी PF काढण्याचे नियम बदलले; किती वेळा आणि किती पैसे काढता येणार?

October Temperature: गोव्यात ऑक्टोबरमध्ये उष्णतेचा विक्रम! पणजीत पारा 37.4 अंशांवर, म्हापशात 39.6 अंशांची नोंद

Horoscope: नवरात्रीचा पाचवा दिवस ठरणार भाग्याचा! 5 राशींचे नशीब चमकणार; प्रगतीचे संकेत, आर्थिक लाभाची शक्यता; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

Tourist Death: कळंगुटमध्ये उघड्या लोखंडी सळ्यांनी घेतला पर्यटकाचा जीव; बांधकाम व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा

New Medical College: गोव्यात नवे मेडिकल कॉलेज; 50 एमबीबीएस जागांना केंद्राची मंजुरी, निम्म्या जागा गोमंतकीयांसाठी

SCROLL FOR NEXT