Complaint  Canva
गोवा

Verna IDC: दुसऱ्या गोदामात होता 11 टन स्फोटकांचा साठा; ह्युज प्रेसिझेन कंपनीच्या व्यवस्थापन, कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा

Betul Goa Blast: कंपनीच्या गोदामात झालेल्या स्फोटात १४.५ टन दारुसाठा जळून खाक झाला होता.

Pramod Yadav

मडगाव: बेतूल - नाकेरी येथे ह्युज प्रेसिझन कंपनीच्या गोदामात २० मार्च रोजी रात्री स्फोट झाला. यानंतर गोदामाला आग लागली. याप्रकरणी कंपनी व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच पेसाने (पेट्रोलियम व स्फोटके सुरक्षा संघटना) कंपनीचा परवाना रद्द केला आहे.

कंपनीच्या गोदामात झालेल्या स्फोटात १४.५ टन दारुसाठा जळून खाक झाला होता. यात सुमारे सहा कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, कंपनीच्या दुसऱ्या गोदामात ११ टन स्फोटकांचा साठा ठेवण्यात आला होता. यासाठी आवश्यक सुरक्षा बाळगण्यात आली नाही, असा आरोप करण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी आणि पेसाचे अधिकारी यांनी स्फोट झाला त्या घटनास्थळी भेट देऊन दुसऱ्या गोदामातील अवैध स्फोटकांचा साठा सील केला होता. स्फोटके साठवलेल्या ठिकाणी सुरक्षिततेचे आवश्यक उपाय न केल्याने कंपनी विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कुंकळ्ळी पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'धुरंधर' स्टाईल फायरींगनं हादरला पाकिस्तान! जैश-ए-मोहम्मदच्या बड्या कमांडरचा खेळ खल्लास; अज्ञात बंदूकधाऱ्यांनं काढला काटा VIDEO

VIDEO: जखमी चेहरा, पाठीवर रडणारी बहीण, पुराचा हाहाकार! नेपाळमधील 'तो' 50 सेकंदांचा व्हिडिओ व्हायरल; तुमचेही पाणावतील डोळे

नो बॉलनंतर 'फ्री हिट' नको, गोलंदाजाला दंड ठोठवावा! सुनील गावसकरांची मोठी मागणी

Terrorist Secret Communication: गुप्त संवादासाठी अश्लील संकेतस्थळांचा वापर, दहशतवाद्यांची नवीन कार्यपद्धती; सोशल मीडियाला शोधला नवीन पर्याय

Mapusa: म्‍हापशात विक्रेत्यांचा रस्त्यावर 'कब्जा'; सगळीकडे अतिक्रमण, बेशिस्‍त पार्किंग; वाहतुकीचा पूर्णपणे बोजवारा

SCROLL FOR NEXT