Galgibaga Beach Dainik Gomantak
गोवा

Morjim Beach: मोरजी किनारी सागरी कासवांची 11 हजार अंडी

दैनिक गोमन्तक

Morjim Beach: मोरजी पंचायत क्षेत्रात 1997 पासून सागरी कासव संवर्धन मोहीम वन विभाग व ‘मरीन लाईन’ मार्फत आजपर्यंत यशस्वीपणे ही मोहीम राबवली जात आहे. आतापर्यंतच्या इतिहासात केवळ दोन महिन्यांच्या कालावधीत सर्वाधिक 112 सागरी कासवांनी तब्बल 11 हजारपेक्षा जास्त अंडी घालून विक्रम प्रस्थापित केला आहे.

यापूर्वी अशा मोठ्या संख्येने सागरी कासव कधीच या किनारी भागात आली नव्हती. मागच्या पंचवीस वर्षापासून सुरुवातीला वन खाते त्यानंतर वन्य विभाग आणि आता मरीन लाईन या मार्फत मोरर्जी तेमवाडा किनारी भागात सागरी कासव संवर्धन मोहीम राबवली जाते. आणि त्याच अनुषंगाने मोरजी, मांद्रे हे दोन समुद्रकिनारे ‘सायलेंट झोन’ जाहीर केले.

परंतु या सागरी कासवांनी ध्वनी प्रदूषणाचा मारा सहन करत देखील आम्ही या ध्वनी प्रदूषणाला किंवा दारू कामाच्या आतषबाजीलाही घाबरत नाही. उलट आम्ही जास्त संख्येने किनाऱ्यावर येऊन अंडी घालू हे सिद्ध करून दाखवले आहे.

टेंबवाडा किनारी भागात डिसेंबरच्या पहिल्याच आठवड्यात सागरी कासवांनी अंडी घालायला सुरुवात केली होती. अजून दोन महिने पूर्ण झाले नसले तरी सर्वाधिक ११२ सागरी कासवांनी या किनाऱ्यावर येऊन अंडी घातली. आणि त्यांना वन विभागामार्फत सुरक्षा देण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. २४ तास पहाऱ्यासाठी वनकर्मचारी तैनात आहेत.

आतापर्यंतची आकडेवारी

  • २०२० ते २०२१ या वर्षात २४ कासवांनी ३४९६ अंडी घातली,१६७४ पिल्ले वनविभागाने समुद्रात सोडली.

  • २०२२ साली ६९ सागरी कासवांनी ५७०३ अंडी घातली, तर त्यातून ३८४२ पिल्ले समुद्रात सोडण्यात आली.

  • २०२३-२४ या चालू वर्षात ११२ कासवांनी ११ हजारांपेक्षा जास्त अंडी घातली आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

Goa Today's News Live: गोव्यातील सर्व धर्मियांमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचा DNA; मंत्री सिक्वेरा

SCROLL FOR NEXT