Chess  Dainik Gomantak
गोवा

Sightless Chess tournament : दृष्टिहिनांसाठीची बुद्धिबळ स्पर्धा; 108 खेळाडूंचा सहभाग

3 ऑगस्टपासून फातर्पात होणार प्रारंभ

गोमन्तक डिजिटल टीम

Salcete : दृष्टिहिनांसाठीची पश्र्चिम विभागीय बुद्धिबळ स्पर्धा 3 ते 7 ऑगस्टदरम्यान फातर्पा येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण देवस्थानच्या सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश व गोवा राज्यातील 108 खेळाडू सहभागी होणार असून ही स्पर्धा 9 फेऱ्यांची असेल.

स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंमध्ये 80 फिडे मानांकन खेळाडू असून गतसाली ही स्पर्धा जिंकलेले दर्पन इनानी (गुजरात), रौप्यपदक विजेते आश्र्विन मखवाना (गुजरात) व कांस्यपदक जिंकलेले संजय कवळेकर (गोवा) यांचा समावेश आहे. या स्पर्धेतून प्रथम 15 खेळाडूंची निवड राष्ट्रीय स्पर्धेसाठी केली जाईल, असे स्पर्धेचे आयोजक अध्यक्ष किशोर बांदेकर यांनी सांगितले.

मडगावात घेतलेल्या आजच्या पत्रकार परिषदेला आयोजक अध्यक्ष किशोर बांदेकर, आयोजक सचिव संजय कवळेकर, निमंत्रक प्रीती मेंडिस, तसेच शरेंद्र नाईक, समीर नाईक, किशोर देसाई, अमृत नाईक व बाळकृष्ण पोडुवाल हे उपस्थित होते.

50 हजारांची बक्षिसे

या स्पर्धेसाठी 50 हजार रुपयांची बक्षिसे प्रायोजित केली आहेत. विजेत्याला 10 हजार व चषक, उपविजेत्याला 8 हजार व चषक, तिसरे स्थान - 5 हजार व चषक तसेच चौथे ते दहावे स्थान व 11 वे ते 15 वे स्थान- अनुक्रमे प्रत्येकी 4 हजार व 1200 रुपये दिले जातील.

गोव्यात ही स्पर्धा आयोजित होण्याची दुसरी वेळ असून यापूर्वी 2011 साली ही स्पर्धा याच ठिकाणी यशस्वीपणे आयोजित केली होती. गोव्यातही अनेक दृष्टिहीन बुद्धिबळ खेळाडू आहेत. त्यांचा शोध घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्यात येईल.

- किशोर बांदेकर, आयोजक अध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

तवडकरांना मिळाली गावडेंकडे असलेली सर्व खाती, 'आदिवासी कल्याण'ही पाहणार; कामतांकडे PWD, आणखी 2 मंत्र्यांना मिळाली 2 खाती

Bicholim: डिचोलीत झाली 4 टन फुलांची विक्री, भाव वाढल्याने विक्रेते आनंदी; चतुर्थीच्या पूर्वदिनी 'अच्छे दिन'

Goa Live Updates: जम्मू परिसरात दिवसात 380 मिमी पाऊस

Modak Significance: गणरायाला का प्रिय आहे मोदक? काय सांगते पुराण? वाचा महत्व..

Ganesh Festival: बौद्ध-जैन धर्मीयांनाही मान्य असलेले दैवत, गणपतीबाप्पाचे सर्वधर्मीय आकर्षण

SCROLL FOR NEXT