breast cancer  Dainik Gomantak
गोवा

गोव्यात 1002 महिलांचा स्तनांच्या कर्करोगामुळे मृत्यू; महिन्याला सरासरी 8 मृत्यू; जाणून घ्या आकडेवारी

Parliament Monsoon Session: संसदेचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनादरम्यान केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे.

Manish Jadhav

संसदेचे सध्या पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनादरम्यान केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी एक महत्त्वाची माहिती दिली आहे. 2014 ते 2023 या दहा वर्षात राज्यात महिन्याला सरासरी 8 महिलांचा मृत्यू स्तनाच्या कर्करोगामुळे झाल्याचे मंत्रीमहोदयांनी लेखी उत्तराद्वारे सांगितले. शफी परांबील यांनी लोकसभेत अतारांकित प्रश्न उपस्थित केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद राष्ट्रीय कर्करोग नोंदणी प्रकल्प राबवतेय. यानुसार, देशभरात 2014 ते 2023 या काळात कर्करोगामुळे मृत्यू झालेल्या मृत्यूसंबंधी आकडेवारी काढण्यात आली. या आकडेवारीनुसार, गोव्याबाबत धक्कादायक आकडेवारी समोर आल्याने चिंता वाढली आहे. गेल्या दहा वर्षात गोव्यात 1002 महिलांचा केवळ स्तनांच्या कर्करोगामुळे मृत्यू झाला. विशेष म्हणजे, 2023 या वर्षात सर्वाधिक 110 मृत्यू झाले. तर 2022 मध्ये 109, 2021 मध्ये 106 तर 2020 मध्ये 103 महिलांचा मृत्यू झाला.

तसेच, गोव्यात 2014 ते 2023 या दहा वर्षात 441 महिलांचा गर्भाशय मुखाच्या कर्करोगामुळे मृत्यू झाला. तर सर्वाधिक 2023 मध्ये सर्वाधिक 48 महिलांचा मृत्यू झाला. 2021 आणि 2022 मध्ये प्रत्येकी 47 2020 मध्ये 54, 2019 मध्ये 44, 2018 आणि 2017 मध्ये 43, 2016 मध्ये 42, 2015 मध्ये 41, 2014 मध्ये 40 महिलांचा गर्भाशय मुखाच्या कर्करोगामुळे मृत्यू झाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

St Estevam: संतापजनक! आठवीत शिकणाऱ्या 10 मुलांना वळ उठेपर्यंत मारहाण, सांतइस्तेव येथील शिक्षिकेवर गुन्हा दाखल

Goa Politics: 'एसटींसोबत रक्‍ताचे नाते सांगणारे आले अन् गेले'; मुख्‍यमंत्री, सभापतींकडून गावडेंवर खोचक ‘बाण’

Monsoon Trip Goa: मान्सूनमध्ये गोव्यात कुठली 'ऑफबीट' ठिकाणं एक्सप्लोर कराल? वाचा खास टिप्स

SCROLL FOR NEXT