Saint Francis Xavier Dainik Gomantak
गोवा

Saint Francis Xavier Exposition: पाकिस्तानातून शेकडो भाविक गोव्यात येणार, संत झेवियर शवदर्शन सोहळ्याला लावणार हजेरी

St Francis Xavier Exposition 2024: संत फ्रान्सिस झेवियर यांचा शव दर्शन सोहळा येत्या २१ नोव्हेंबर २०२४ ते ०५ जानेवारी २०२५ या काळात होणार आहे.

Pramod Yadav

पणजी: 'गोंयचो सायब', संत फ्रान्सिस झेवियर यांच्या शवप्रदर्शन सोहळ्याला देश - विदेशातून लाखो ख्रिस्ती भाविक हजेरी लावणार आहेत. येत्या २१ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या या सोहळ्यासाठी सरकार जय्यत तयारी करत आहे.

या सोहळ्याला सीमापार पाकिस्तानातून देखील भाविक उपस्थिती लावणार असल्याची माहिती आहे. यासाठी पाकिस्तानातून भारत सरकारकडे अर्ज प्राप्त झाले असून, त्यात शवदर्शन सोहळ्याचे मुख्य कारण नमूद करण्यात आले आहे.

ओल्ड गोव्यातील बॅसिलिका बॉम जिझस चर्चमध्ये संत फ्रान्सिस झेवियर यांचे शव ठेवण्यात आले आहे. याचा शव दर्शन सोहळा येत्या २१ नोव्हेंबर २०२४ ते ०५ जानेवारी २०२५ या काळात होणार आहे. यासाठी सरकार जोरदार तयारी करत आहे.

लाखो भाविक या दर्शन सोहळ्याला हजेरी लावण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पाकिस्तानातून देखील मूळ गोमंतकीय वंशाचे नागरिक या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. पाकिस्तानातील शेकडो भाविकांनी यासाठी केंद्र सरकारकडे व्हिसासाठी अर्ज केला आहे. यात भेटीचे कारण संत फ्रान्सिस झेवियर शवदर्शन सोहळ्याचे देण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने या भाविकांना भारत भेटीची परवानगी दिली असून, गोवा पोलिसांनी प्राप्त अर्जाची छाननी करण्याचे काम केले. भारत पाकिस्तान व्हिसा करार २०१२ अंतर्गत या पाकिस्तानी नागरिकांना भारत भेटीची परवानगी देण्यात आलीय.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cyber Crime: एस्कॉर्ट सर्व्हिसच्या नावाखाली सुरू असलेल्या ७८ वेबसाईट्स ब्लॉक; गोवा पोलिसांचा दणका, दोघांना अटक

Rashi Bhavishya 15 November 2024: आरोग्यात सुधारणा होईल, नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी प्रगती कराल; जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस

Goa Politics: मांद्रेतील जनतेच्या मनात कोण? मायकल लोबोंमुळे हवा तापली; अरोलकरांनी दिलं चॅलेंज

Goa Crime: धारदार शस्त्राने वडिलांचा जीव घेणारा प्रमोद 'मानसिक रुग्ण'; बहिणीचा पोलिसांसमोर खुलासा

Goa Electricity: फाईव्ह स्टार एसी, Led दिवे; वीज बचतीबाबत सरकारी कार्यालयांसाठी नवी नियमावली

SCROLL FOR NEXT