Pig Dainik Gomantak
गोवा

Goa News: वराहांचे 100 किलो मांस जप्‍त

पेटके येथील प्रकार : 13 वराहांची बोंडला अभयारण्यात रवानगी

गोमन्तक डिजिटल टीम

धारबांदोडा तालुक्यातील पेटके येथे वन खात्याने छापा टाकून वराहांचे 100 किलो मांस जप्‍त केले. तर 13 जिवंत वराहांची रवानगी बोंडला अभयारण्‍यात केली. रानटी वराह असल्‍याचे सांगून पाळीव वराहांचे मांस विकण्‍यात येत होते. वन खात्याचे अधिकारी नारायण प्रभुदेसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी 8 वाजता ही कारवाई करण्‍यात आली.

मिळालेल्‍या माहितीनुसार, पेटके येथे गेलो असता वराहांची कत्तल होत असल्याचे दिसून आले. तपास केला असता तेथे 13 जिवंत वराह सापडले. तेव्हा त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट होती. त्यांचे पाय बांधले होते. येथे चार वराहांची कत्तल करण्यात आली आहे. कत्तल करण्यात आलेल्या वराहांचे 100 किलो मांस जप्त केले आहे. पोलिसांनी पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे.

सांगे, मडगाव तसेच फोंडा शहरात मोठ्या प्रमाणात या पाळीव वराहांच्या मांसाची विक्री होत आहे. 200 रुपये मूळ जागेवर दर आहेत तर दलालांकडून रानटी मांस असल्याचे सांगून 500 ते 800 रुपये दराने विक्री होत असल्याचे बसव्वा यांनी सांगितले.

या जमिनीचे मालक बेली रॉड्रिग्स यांना दर महिन्याला 15 हजार रुपये भाडे आम्ही देत आहोत. त्यांना आम्ही या ठिकाणी पाळीव वराहांची कत्तल करतो हे माहीत आहे. आम्हाला मांस धुण्यासाठी त्यांच्याच पंपाद्वारे पाणी मिळते, असे बसव्वा यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: भाग्य उजळणार! मंगळवारी 'या' 5 राशींवर लक्ष्मीची कृपा; बँक बॅलन्स वाढणार, प्रमोशनही मिळणार!

IND vs AFG: विजयाचा नवा सुवर्ण इतिहास! अफगाणिस्तानचा 300 धावांनी उडवला धुव्वा, टीम इंडियाने मोडले 5 मोठे रेकॉर्ड्स

Guru Shukra Yuti 2026: दारिद्र्य संपणार, श्रीमंती येणार! 10 जूनपासून खुला होणार कुबेराचा खजिना; शुक्र-गुरुची युती 3 राशींना बनवणार मालामाल

प्रत्येक पंचायतीला 10 हजार रोपं लावण्याचं टार्गेट! सरकारी आदेशानंतर गोव्यातील गावागावांत जागेसाठी धावपळ; वृक्षारोपणानं समोर आणलं वास्तव

Indian Population: "भारताचा जन्मदर सातत्याने घटतोय..." एलॉन मस्कच्या 'त्या' पोस्टने उडवली खळबळ

SCROLL FOR NEXT