IVF Treatment in GMC Dainik Gomantak
गोवा

Goa GMC: आव्हीएफ उपचारासाठी 100 दाम्पत्यांची नोंदणी

Goa GMC: आरोग्यमंत्री विश्वजीत राणे: टप्प्याटप्प्याने उपचार सुरू

दैनिक गोमन्तक

Goa GMC: राज्यातील जनतेला उत्कृष्ट आधुनिक आरोग्य सेवा देण्यासाठी खात्याचे प्रयत्न सुरू आहेत. याचाच भाग असणाऱ्या आणि २ महिन्यापूर्वी सुरू केलेल्या विशेष वंध्यत्व निवारण (आयव्हीएफ) विभागात शंभरच्या वर दाम्पत्यांनी या उपचारासाठी आपली नाव नोंदणी केली असल्याची माहिती आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली आहे.

आरोग्य खात्याच्या वतीने गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील (जीएमसी) सुपर स्पेशलिटी विभागात 1 सप्टेंबर रोजी प्रथमच वंधत्व निवारण आयव्हीएफ आणि आययुआय या अत्यंत महागड्या सुविधा जनतेसाठी मोफत सुरू करण्यात आल्या आहेत.

विभाग प्रमुख डॉ. केदार फडते, रुग्णालयाचे डीन डॉ. शिवानंद बांदेकर, अधीक्षक डॉ. राजेश पाटील, डॉ. म्युरेल कारदोज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या विभागात ह्या सुविधा उपलब्ध केल्याने राज्यातील अनेक नागरिकांना याचा लाभ होत आहे. अ

त्यंत महागड्या असणाऱ्या या उपचारासाठी आतापर्यंत 100 च्यावर दाम्पत्याने आपली नाव नोंदणी केली आहे. यातील पहिल्या 10 रुग्णांवर उपचार सुविधा सुरू झाली असून पुढील 10 रुग्णांसाठी क्यू करण्यात आले आहे.

देशात प्रथमच आयव्हीएफ आणि आययुआय या अत्याधुनिक महागड्या, आरोग्य सुविधा मोफत खुल्या करत आहोत. देशात ''दिल्ली मॉडेल''चा केवळ गवगवा आहे. प्रत्यक्षात तिथे कोणत्या सुविधा मिळतात हे पाहावे लागेल. मात्र आम्ही अत्यंत आधुनिक अशा सर्व प्रकारच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देत आहोत.
- विश्वजीत राणे, आरोग्यमंत्री

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT