Quepem Ganesh Mandal Lottery News Dainik Gomantak
गोवा

Quepem Lottery: केपेत गणेशोत्सव लॉटरी कुपन खरेदीसाठी 1 किलोमीटरची रांग; पहाटे 5 वाजल्यापासून लोक रांगेत

रविवारी चेंगराचेंगरीच्या भीतीने कुपन विक्री केली होती बंद

Akshay Nirmale

Quepem Ganesh Mandal Lottery: केपे येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने दरवर्षीप्रमाणे यंदाही देणगीवजा लॉटरी कुपन विक्रीस रविवारी प्रारंभ केला होता.

तथापि, कुपन खरेदीसाठी व लाखोंच्या बक्षिसांसाठी नागरिकांची झुंबड उडाली. त्यातून हुल्लडबाजी सुरू झाली.

अखेर चेंगराचेंगरीचा प्रसंग ओढवू नये म्हणून पोलिसांना हस्तक्षेप करून ही लॉटरी कुपन विक्री बंद करावी लागली होती.

त्यानंतर आज, सोमवारी २८ ऑगस्ट रोजी देणगी कुपन विक्री सकाळी केपे सरकारी महाविद्यालयाच्या सभागृहात सुरू होणार होती. मंडळाचे अध्यक्ष इचित फळदेसाई यांनी रविवारी ही माहिती दिली होती.

सोमवारच्या कुपन विक्रीसाठी पहाटे पाच वाजल्यापासूनच नागरीकांच्या रांगा लागल्या होत्या. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.

दरम्यान, देणगी कुपन खरेदी करण्यासाठी नागरिकांनी रविवारी सकाळी साडे पाच वाजल्यापासून केपे बाजारात गर्दी करण्यास सुरवात केली होती.

उद्‍घाटन सोहळा पंधरा मिनिटात आटोपता घेऊन कुपन विक्रीला सुरवात केली गेली पण गर्दी वाढत गेली.

पालिका उद्यानाच्या आवारात ही कुपन विक्री सुरू झाली. यावेळी लोकांनी रांगेत उभे रहायचे सोडून थेट कुपन विक्री काउंटरकडे धाव घेतली. गर्दीमुळे उद्यानाचे मुख्य प्रवेशद्वार मोडले. तसेच विक्री काउंटरही मोडला.

यावेळी केपे पोलिसांनी व सुरक्षा रक्षकांनी लोकांना आवरण्याचा बराच प्रयत्न केला, पण लोकांची गर्दी वाढतच गेल्याने या गर्दीचे चेंगराचेंगरीत रूपांतर होऊन जीवित हानी होऊ नये म्हणून अखेर मंडळाने कुपन विक्री बंद केल्याचे जाहीर केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT