Dainik Gomantak
गोवा

Goa News: टिंटेड कारमधून धारगळ पंचाची एन्ट्री; गोवा पोलिसांनी जारी केले चलन; वाचा गोव्यातील ठळक घडामोडी

02 December 2024 Marathi Breaking News: सनबर्न, गोंयच्या सायबाचे फेस्त, शवप्रदर्शन सोहळा आणि महत्वाच्या घडामोडी

Akshata Chhatre

टिंटेड कारमधून धारगळ पंचाची एन्ट्री; गोवा पोलिसांनी जारी केले चलन

धारगळचे पंच पूर्ण टिंटेड कारमधून पोलिसांसमोर पंचायतीत दाखल झाले. गोवा पोलिसांनी 1000 रुपयांचे चलन जारी करून कारवाई केली आहे.

गोव्यात मिल्क बँकला सुरुवात होणार

गोव्यात मिल्क बँक स्थापन करण्यासाठी गोवा सरकार इंडियन ऑईलसोबत सहकार्य करेल अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.

विक्रांत शेट्टीला सशर्त जामीन मंजूर!

मनी लाँड्रिंग आणि जमीन हडपण्यातील मुख्य संशयित विक्रांत शेट्टी याला उच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे.

टिंटेड कारसह धारगळ पंचाची एन्ट्री; गोवा पोलिस कारवाई करणार

धारगळचे पंच पूर्ण टिंटेड कारमधून पोलिसांसमोर पंचायतीत दाखल झाले. गोवा पोलिसांनी सोशल मीडियावर नमूद केले आहे की यावर कारवाई केली जाईल.

गोव्यात पहिल्या ॲलोपॅथिक आणि आयुर्वेदिक इंटिग्रेटेड रुग्णालयाचे उद्घाटन

डिचोली येथे गोव्यातील पहिल्या ॲलोपॅथिक आणि आयुर्वेदिक इंटिग्रेटेड रुग्णालयाचे उद्घाटन झाले. या रूग्णालयाचा फायदा गोव्यातील तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटकातून येणाऱ्या रुग्णांना होणार आहे. येत्या 5-6 महिन्यांत रुग्णालय सुरू होण्याची शक्यता आहे. EWS साठी रुग्णालयात 10% सेवा मोफत असतील अशी माहिती मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.

धारगळ पंचायतीने सनबर्नला दिली मान्यता!

धारगळ पंचायतीने सनबर्नला दिली परवानगी. ५ विरुद्ध ४ मतांनी सनबर्नच्या अर्जाला मंजूरी.

"जर ती सामान्य माणसाची गाडी असती तर कारवाई झाली असती" : पालेकर

ॲड. अमित पालेकर यांनी पंच सदस्यानी पोलिसांसमोर टिंटेड कारमध्ये प्रवेश करण्यावर टिप्पणी केली. पालेकर म्हणतात की," दबंग राजकारणी आणि शक्तीहीन गोवा पोलिस अशी ही गत आहे. ती सामान्य माणसाची गाडी असती तर पोलिसांनी टींट फाडून टाकली असती पण राजकारण्यांच्या गाडीला हात लावायची त्यांच्यात मुळीच ताकद नाही. "

समाज घडवण्याचे का बिघडवण्याचा कार्य?; गिरीश कामतांचा सनबर्न समर्थकांना सवाल

जे लोक सनबर्न महोत्सवाला समर्थन करतात ते आपल्या कुटुंबासह या महोत्सवाला जाणार का? आम्ही समाज घडविण्याचे काम करतो की बिघडविण्याचे? भाजप कार्यकर्ते गिरीश कामत यांचा समर्थकांना सवाल

धारगळ पंचायतीबाहेर पोलिस फौजफाटा,पत्रकारांवर निर्बंध

धारगळ पंचायतीकडे मोठ्या प्रमाणात पोलिस फौजफाटा तैनाद. सनबर्नच्या परवानगीसाठी आलेल्या अर्जावर निर्णय देण्यासाठी पंचायत मंडळाची सोमवारी (२ डिसेंबर २०२४) बैठक. पत्रकारांवर मात्र निर्बंध.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kundaim Fire: कुंडई वीजतारांमुळे वाढला धोका! आगीच्या घटनांमध्ये वाढ; तातडीने उपाययोजना करण्याची मागणी

खोटी कागदपत्रं वापरून घेतला पासपोर्ट, गोव्यात करायची सलूनमध्ये काम; फिलिपिन्स महिलेसह स्थानिकाच्या आवळल्या मुसक्या

"वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून विकास करणार"! रितेश नाईकांनी दिली ग्वाही; पांचमे- खांडेपार तळ्याच्या संवर्धन कामाचे केले उद्‍घाटन

Farmagudhi to Bhoma Road: फर्मागुढी-भोम रस्ता काम होणार सुरु! मंत्री कामतांची ग्वाही; बांदोडा ‘अंडरपास’चे उद्‌घाटन

Chimbel Unity Mall: 'चिंबल' ग्रामस्थांचे मोठे यश! युनिटी मॉल बांधकाम परवान्याला दिले आव्हान; सरकारी पक्षाचा विरोध फेटाळला

SCROLL FOR NEXT