Yashasvi Jaiswal  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

IND Vs ENG: जयस्वालची दमदार खेळी! 'मुंबईच्या राजाचा' मोडला रेकॉर्ड; सेना देशात केला मोठा कारनामा

Yashasvi Jaiswal Breaks Rohit Sharma’s Record: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना एजबॅस्टन येथे खेळला जात आहे.

Manish Jadhav

Yashasvi Jaiswal Breaks Rohit Sharma’s Record: भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना एजबॅस्टन येथे खेळला जात आहे. या कसोटी सामन्यात टीम इंडियाने चांगली सुरुवात केली. लीड्स येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात शतक झळकावणारा सलामीवीर यशस्वी जयस्वालने या सामन्यातही चांगली सुरुवात केली.

एजबॅस्टन कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी लंच ब्रेकपर्यंत जयस्वालने आपले अर्धशतक पूर्ण केले. या अर्धशतकी खेळीच्या जोरावरच त्याने रोहित शर्माचा विक्रम मोडला. सलामीवीर फलंदाज म्हणून SENA देशांमध्ये सर्वाधिक अर्धशतकांपेक्षा जास्त धावा काढण्याच्या बाबतीत जयस्वालने रोहित शर्माला मागे सोडले.

जयस्वालची शानदार फलंदाजी

दरम्यान, भारताचा माजी कसोटी कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) SENA देशांमध्ये सलामीवीर म्हणून 4 पन्नासपेक्षा जास्त धावा केल्या होत्या. आता जयस्वालने SENA देशांमध्ये सलामीवीर म्हणून 5 पन्नासपेक्षा जास्त धावा केल्या. जयस्वालने इंग्लंडविरुद्धच्या लीड्स कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात शतक झळकावले होते, तो 101 धावा केल्यानंतर बाद झाला होता. यापूर्वी, जयस्वालने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिका खेळली होती. तिथे त्याने पाच सामन्यांमध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांच्या मदतीने 391 धावा केल्या होत्या. पर्थमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात जयस्वालने 161 धावा केल्या होत्या, तर मेलबर्न कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 82 धावा आणि दुसऱ्या डावात 84 धावा केल्यानंतर बाद झाला होता.

रोहितने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली

सेना देशात रोहित शर्माने इंग्लंडमध्ये (England) सलामीवीर म्हणून एकूण तीन अर्धशतकांपेक्षा जास्त धावा केल्या आहेत. रोहितने इंग्लंडमध्ये एकूण 6 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 44.54 च्या सरासरीने 490 धावा केल्या आहेत. याशिवाय, त्याने ऑस्ट्रेलियामध्ये सलामीवीर म्हणून अर्धशतक देखील केले आहे. दुसरीकडे, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडमध्ये कसोटी क्रिकेटमध्ये रोहित शर्मा बॅटने काही खास कामगिरी करु शकला नाही. इंग्लंड मालिकेपूर्वी रोहितने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, आता तो फक्त वनडे फॉरमॅटमध्ये खेळताना दिसेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

TCS Layoff: मोठी बातमी! टीसीएस देणार 12,000 जणांना नारळ; सीईओ म्हणाले, 'भविष्यासाठी गरजेच...'

Goa Live News: नागपंचमीसाठी नागोबा सज्ज

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

SCROLL FOR NEXT