Yash Kasavankar Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Yash Kasavankar: धुरंधर यश कसवणकरचं आश्वासक 'अष्टपैलूत्व', 19 अन् 23 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत पाडली छाप

All-Rounder Yash Kasavankar Performance: गोव्याच्या उदयोन्मुख, नवोदित क्रिकेटपटूंत यश कसवणकर याचा गतमोसमातील अष्टपैलू फॉर्म आश्वासक ठरला. या पार्श्वभूमीवर आगामी मोसमासाठी सीनियर (रणजी) क्रिकेट संघ निवड प्रक्रियेत साहजिकच त्याच्यावर लक्ष राहील.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोव्याच्या उदयोन्मुख, नवोदित क्रिकेटपटूंत यश कसवणकर याचा गतमोसमातील अष्टपैलू फॉर्म आश्वासक ठरला. या पार्श्वभूमीवर आगामी मोसमासाठी सीनियर (रणजी) क्रिकेट संघ निवड प्रक्रियेत साहजिकच त्याच्यावर लक्ष राहील.

यश कसवणकर याने २०२४-२५ मोसमात १९ वर्षांखालील कुचबिहार करंडक (चार दिवसीय सामने) व विनू मांकड करंडक (एकदिवसीय सामने) स्पर्धेत गोव्याचे नेतृत्व केले. कर्णधारपदाची जबाबदारी पेलताना त्याने ऑफस्पिन गोलंदाजीत, तसेच फलंदाजीतही छाप पाडली. कुचबिहार करंडक स्पर्धेत लाहली येथे हरियानाविरुद्ध झुंजार शतक (१०१) केले. या मैदानावरील खेळपट्टी नेहमीच स्विंग गोलंदाजांना साह्य करते. यावरून यश याच्या शतकाचे मोल लक्षात येते.

गोव्याच्या १९ वर्षांखालील संघाचे प्रशिक्षक सगुण कामत यांनी सांगितले, की ‘‘यश कसवणकरची कणखर मानसिकता लक्षात घेता, योग्य वेळी संधी मिळाल्यास निश्चितच त्याचा आत्मविश्वास उंचावेल. लाहली येथे वेगवान गोलंदाजीस साह्य करणाऱ्या खेळपट्टीवर त्याने केलेले शतक त्याच्या परिपक्वतेचे प्रमाण आहे. रणजी संघाच्या ड्रेसिंग रुममध्ये आल्यानंतर तो आणखीनच प्रगल्भ बनेल यात शंकाच नाही.’’ सगुण हे गोव्याचे माजी रणजी संघ कर्णधार, तसेच त्रिशतक नोंदविलेले सफल फलंदाज आहेत, साहजिकच यश याच्याबद्दल त्यांचे मत महत्त्वपूर्ण ठरते.

उल्लेखनीय शतकी खेळी

गतमोसमात १९ वर्षांखालील स्पर्धेतील कामगिरीच्या आधारे यश कसवणकरची २३ वर्षांखालील संघात निवड झाली. या वयोगटातही तो उल्लेखनीय ठरला. वरच्या वयोगटातही त्याने दबावविरहीत खेळ केल्याचे दिसून आले. २३ वर्षांखालील कर्नल सी. के. नायडू करंडक (चार दिवसीय सामने) स्पर्धेत तो अखेरचे दोन सामने खेळला. वलसाड येथील सामन्यात गुजरातच्या फलंदाजांनी गोव्याच्या (Goa) गोलंदाजांवर पूर्ण वर्चस्व राखलेले असताना यश याने एका बाजूने टिच्चून मारा करत पाच गडी टिपले. २३ वर्षांखालील एकदिवसीय करंडक स्पर्धेत रायपूर येथे जम्मू-काश्मीरविरुद्ध प्रेक्षणीय नाबाद शतक (१००) झळकावले.

२०२४-२५ मध्ये

१९ वर्षांखालील एकदिवसीय स्पर्धा ः ५ सामने, ३५.४च्या सरासरीने १७७ धावा, १ अर्धशतक, १९.५च्या सरासरीने ८ विकेट

१९ वर्षांखालील कुचबिहार करंडक (चार दिवसीय) स्पर्धा ः ५ सामने, ३७.५५च्या सरासरीने ३३८ धावा, १ शतक, १ अर्धशतक, ४६.०८च्या सरासरीने १२ विकेट

२३ वर्षांखालील कर्नल सी. के. नायडू करंडक (चार दिवसीय) स्पर्धा ः २ सामने, १३च्या सरासरीने ५२ धावा, ३७.८७च्या सरासरीने ८ विकेट, १ वेळ डावात ५ विकेट

२३ वर्षांखालील एकदिवसीय स्पर्धा ः ६ सामने, ४२.२च्या सरासरीने २११ धावा, १ शतक, १ अर्धशतक, ५५.३३ च्या सरासरीने ३ विकेट

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ashadhi Ekadashi: ..जातां पंढरीसी सुख वाटे जीवा। गोव्यातील लाखो वारकऱ्यांनी गाठले पंढरपूर

Sanguem Rathotsav: विठ्ठल, विठ्ठल! सांगेत भाविकांचा पूर, रथोत्सवानिमित्त होणार विठूनामाचा गजर

Goa Live News Updates: ऑनलाईन फ्रॉडमधून ३ लाख ३५ हजार रुपयांचा गंडा

Goa Crime: अनैतिक संबंधातून पतीचा खुन! संशयितेला व्‍हिडिओ कॉन्‍फरन्‍सिंगमध्‍ये आणण्यात अपयश; कोलवाळ तुरुंग अधीक्षकाला नोटीस

Criminals In Goa: पोलिसांवर हल्ला, अनेकदा फरार! दिल्लीतील ‘गोगी टोळी’च्या गुंडास गोव्यात अटक; गुन्हेगारांसाठी बनतेय ‘आश्रयस्थान’?

SCROLL FOR NEXT