Actor Yash Birthday| Yash in Goa
Yash in GoaDainik Gomantak

Actor Yash in Goa: रॉकिंग स्टारचा गोव्यात वाढदिवस साजरा; पत्नी राधिका फोटोज शेअर करत म्हणाली, "जगातल्या सर्वोत्तम नवऱ्याला शुभेच्छा"

Actor Yash Birthday Celebration: यशची पत्नी राधिका पंडित हिने वाढदिवसाचे खास फोटोज सोशल मीडियावर शेअर केले होते
Published on

Actor Yash Birthday in Goa

गोवा: दक्षिणेतील सुपरस्टार आणि केजीएफमधून प्रसिद्धी मिळवलेल्या यश कुमार गौडा याने ८ जानेवारीला गोव्यात परिवारासोबत ३९वा वाढदिवस साजरा केला. यशचा चाहतावर्ग फार मोठा आहे, मात्र तरीही कोणाला तो गोव्यात असल्याची खबर नव्हती. यशची पत्नी राधिका पंडित हिने वाढदिवसाचे खास फोटोज सोशल मीडियावर शेअर केले होते.

यश आणि त्याच्या पत्नीने एकाच रंगाचे कपडे परिधान केले होते. परिवारासह त्याने रात्री समुद्रकिनाऱ्यावर चॉकलेट केक कापला आणि सर्वांसोबत आनंद साजरा केला.

Actor Yash Birthday| Yash in Goa
Celebrity Birthday Goa: करणने गर्लफ्रेन्ड तेजस्वीसोबत गोव्यात साजरा केला वाढदिवस; लव्हबर्ड्सने शेअर केले Photo, Video

वाढदिवसाच्या आधीच यशने त्याच्या चाहत्यांना तो शूटिंगसाठी बाहेर जाणार असल्याची माहिती दिली होती आणि दरम्यान सर्वांनी जबाबदारीने वागावं, तुमचं प्रेम माझ्यासोबत कायम राहील आणि तुमच्या शुभेच्छा देखील माझ्यापर्यंत पोहोचत राहतील असा संदेश दिला होता.

राधिकाने शेअर केलेल्या पोस्टमध्ये दोघांमधलं प्रेम दिसून येतंय. पहिल्या दोन फोटोजमध्ये राधिका आणि यश यांचे कँडिड मोमेंट्स कॅप्चार केले गेलेत तर पुढच्या फोटोमध्ये त्याची दोन लहान मुलं देखील पाहायला मिळतायत.

आर्या आणि याथर्व यांच्यासोबत यश अगदी खुश दिसतोय. राधिकाने हे फोटोज शेअर करत नवऱ्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात. ती म्हणते की, "जगातल्या सर्वोत्तम नवऱ्याला आणि बाबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा . तू आपल्या मुलांचा आधार आहेस आणि माझ्या हृदयावर कायम राज्य करतोस."

राधिकाने फोटोज शेअर केल्यामुळे यशच्या चाहत्यांना त्याच्या खासगी वाढदिवसाचा आनंद घेता आला. अनेकजण सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव करीत आहेत. वर्ष २०१६ मध्ये यश आणि राधिका यांचं लग्न झालं होतं. येणाऱ्या काही दिवसांमध्ये यशचा नवीन चित्रपट टॉक्सिक प्रदर्शित होणार आहे आणि चाहत्यांना याची उत्कंठा लागून राहिली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com