Womens Cricket News Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Womens Cricket Tournament: गोव्याच्या महिलांची दणदणीत सलामी! कर्णधार पूर्वाची अष्टपैलू कामगिरी; मिझोरमचा दारुण पराभव

Goa Vs Mizoram Womens Cricket Match: गोव्याने ६ बाद ३०९ धावा केल्या. नंतर पूर्वा भाईडकर (३-६) व विधी भांडारे (३-७) या फिरकीद्वयीने मिझोरामचा डाव अवघ्या ५२ धावांत गुंडाळला.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: कर्णधार पूर्वा भाईडकर (१२०) हिचे शतक, तसेच उस्मा खान (७१) हिच्या अर्धशतकामुळे गोव्याने २३ वर्षांखालील महिला एकदिवसीय क्रिकेट सामन्यात त्रिशतकी धावसंख्या रचली आणि नंतर मिझोरामचा धुव्वा उडवत सामना २५७ धावांनी सहज जिंकला. केरळमधील तिरुवनंतपुरम येथील मंगलापुरम येथे बुधवारी ब गटातील सामना झाला.

गोव्याने ६ बाद ३०९ धावा केल्या. नंतर पूर्वा भाईडकर (३-६) व विधी भांडारे (३-७) या फिरकीद्वयीने मिझोरामचा डाव अवघ्या ५२ धावांत गुंडाळला. उस्मा व पूर्वा यांनी तिसऱ्या विकेटसाठी ९३ धावांची भागीदारी केली. नंतर पूर्वा हिने तनया नाईक (नाबाद २८) हिच्यासमवेत सहाव्या विकेटसाठी ८७ धावांची भागीदारी केली.

संक्षिप्त धावफलक ः गोवा ः ५० षटकांत ६ बाद ३०९ (हर्षिता यादव १३, कुशी बांदेकर ३१, उस्मा खान ७१ - ७६ चेंडू, ९ चौकार, १ षटकार, पूर्वा भाईडकर १२० - १०६ चेंडू, १२ चौकार, १ षटकार, तनिशा गायकवाड २, हर्षदा कदम २१, तनया नाईक नाबाद २८, साक्षी गावडे नाबाद २) वि. वि. मिझोराम ः १९.४ षटकांत सर्वबाद ५२ (ममी १३, उस्मा खान ४-१-१३-१, सेजल सातार्डेकर ३-०-१०-०, पूर्वा भाईडकर ५-२-६-३, भारती सावंत २.४-०-१०-१, साक्षी गावडे २-०-६-०, विधी भांडारे ३-०-७-३).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: नोकरीत बढती अन् तगडा आर्थिक लाभ! आजचा शुक्रवार ठरवणार तुमचे नशीब; कोणत्या राशींना मिळणार भाग्याची साथ?

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

SCROLL FOR NEXT