Manolo Marquez 
गोंयचें खेळामळ

Indian Super League: FC Goa च्या कामगिरीवर प्रशिक्षक मार्केझ भडकले; जमशेदपूर विरोधात पराभवाचे कारणही केले स्पष्ट

FC Goa: एफसी गोवाला सामन्याच्या पूर्वार्धात अल्बानियाचा आघाडीपटू आर्मांदो सादिकू याने आघाडी साधून दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: एफसी गोवा संघाला इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील सलामीच्या लढतीत मंगळवारी रात्री फातोर्डा येथे घरच्या मैदानावर जमशेदपूर एफसीकडून २-१ असा धक्कादायक पराभव पत्करावा लागला.

या कामगिरीवर मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझ कमालीचे भडकले असून संघाने खराब खेळ केल्याची कबुली देत त्यांनी पराभवास संघातील परदेशी खेळाडूंनाही जबाबदार धरले.

``भारतात सुमारे पाच वर्षापूर्वी दाखल झाल्यापासून आज मला सर्वांत जास्त राग आला आहे. आजच्यासारख्या कामगिरीची आम्हाला अपेक्षाच नाही, विषेशतः परदेशी खेळाडूंकडून. संपूर्ण सामन्यात परदेशी खेळाडू मैदानावर चालत होते. तुम्हाला माहीत आहे, भारतीय खेळाडूंना त्यांची (परदेशी खेळाडू) गरज आहे.

जर परदेशी खेळाडू चालत असतील आणि स्वतःपुरते खेळत असतील, तर त्या सर्वांसह आम्हाला अडचणी येतील,`` असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.

एफसी गोवाला सामन्याच्या पूर्वार्धात अल्बानियाचा आघाडीपटू आर्मांदो सादिकू याने आघाडी साधून दिली. नंतर अखेरच्या सोळा मिनिटांच्या खेळात जमशेदपूरने दोन गोल नोंदवत पूर्ण तीन गुण प्राप्त केले.

हावी सिव्हेरियो याने पेनल्टीवर बरोबरीचा गोल केला, तर जॉर्डन मरे याने भरपाई वेळेत विजयी गोल नोंदविला. रेफरीने पेनल्टी फटका देण्याच्या निर्णयावर मार्केझ खूश दिसले नाही, पण पेनल्टीचा दावा मंजूर करून घेण्याएवढा प्रतिस्पर्धी खेळाडू सिव्हेरियो हुशार ठरला, तर पेनल्टी फटका मिळू नये यासाठी आपला खेळाडू (ओडेई ओनाइंडिया) तेवढी हुशारी दाखवू शकला नाही, अशी टिप्पणी मार्केझ यांनी केली.

एफसी गोवाचा पुढील सामना शनिवारी (ता. २१) कोलकता येथे मोहम्मेडन स्पोर्टिंगविरुद्ध होईल. स्पर्धेत यंदा पदार्पण केलेल्या मोहम्मेडन स्पोर्टिंगने अगोदरच्या लढतीत उल्लेखनीय खेळ केला होता, पण त्यांना भरपाई वेळेतील गोलमुळे नॉर्थईस्ट युनायटेडकडून एका गोलने निसटता पराभव पत्करावा लागला.

अतिशय वाईट खेळ चिंताजनक

``पेनल्टी गोल किंवा त्या निर्णयामुळे आम्ही सामना गमावला नाही, तर आम्ही खूप वाईटपणे खेळल्यामुळे पराभूत झालो,`` अशी कबुली ५६ वर्षीय मार्केझ यांनी सामन्यानंतर दिली. सामन्यातील सुरवातीच्या वीस मिनिटांनंतर संघाच्या खेळात तीव्रता नव्हती आणि संघाची एकंदरीत कामगिरी चिंताजनक असल्याचेही स्पॅनिश मार्गदर्शकाने मान्य केले.

``दूरवरील चेंडूच्या शैलीत खेळण्यात जमशेदपूर एफसीची सरशी झाली, तसेच ते शारीरिकदृष्ट्या खूप मजबूत होते, त्यात भर म्हणजे आम्ही अजिबात चांगले खेळलो नाही. सांघिक पातळीवर आमचा खेळ खूपच खराब होता,`` असे मार्केझ यांनी नमूद केले.

आयएसएलमध्ये एफसी गोवाची पराभूत सलामी

तारीख - विरुद्ध - स्थळ - निकाल

१५ ऑक्टोबर २०१४ - चेन्नईयीन - फातोर्डा - १-२

४ ऑक्टोबर २०१६ - नॉर्थईस्ट - गुवाहाटी - ०-२

२२ नोव्हेंबर २०२१ - मुंबई सिटी - फातोर्डा - ०-३

१७ सप्टेंबर २०२४ - जमशेदपूर - फातोर्डा - १-२

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT