Danielle Gibson Run Out Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

जबरदस्त डाइव्ह मारली, पण नशिबानं साथ दिली नाही, 'तो' थरारक रनआऊट पाहून धोनीच्या आऊटची आठवण ताजी; VIDEO व्हायरल

Danielle Gibson Run Out in WBBL: पर्थ स्कॉर्चर्सकडून गोलंदाज एमी एडगर हिने पाचवा चेंडू टाकला. तेव्हा 47 धावांवर खेळत असलेली स्टार फलंदाज मेग लॅनिंग हिने शॉट मारुन रन घेण्यास सुरुवात केली.

Manish Jadhav

Danielle Gibson Run Out in WBBL: सध्या भारतीय क्रिकेट चाहत्यांचे संपूर्ण लक्ष भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेवर असले तरी, ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेल्या वुमन बिग बॅश लीगने मनोरंजनात कोणतीही कसर सोडलेली नाही. या लीगमध्ये असे काही चित्तथरारक क्षण पाहायला मिळत आहेत, जे आंतरराष्ट्रीय सामन्यांसारखीच उत्सुकता निर्माण करत आहेत. पर्थ स्कॉर्चर्स वुमन आणि मेलबर्न स्टार्स वुमन यांच्यातील सामन्यात असाच एक क्षण आला, जेव्हा एका रनआऊटने स्टेडियममधील प्रत्येक क्रिकेट चाहत्याचा जीव टांगणीला लावला.

थरारक रनआऊट!

हा थरार मेलबर्न स्टार्सच्या डावातील 16व्या षटकात पाहायला मिळाला. पर्थ स्कॉर्चर्सकडून गोलंदाज एमी एडगर हिने पाचवा चेंडू टाकला. तेव्हा 47 धावांवर खेळत असलेली स्टार फलंदाज मेग लॅनिंग हिने शॉट मारुन रन घेण्यास सुरुवात केली. दुसऱ्या टोकाला असलेली तिची साथीदार डेनिएल गिब्सन तिसऱ्या रनसाठी पळाली. त्याचवेळी, बाउंड्रीवर असलेल्या क्षेत्ररक्षक क्लोई एन्सवर्थ हिने वेगाने विकेट्सच्या दिशेने चेंडू फेकला.

विकेटकीपर बेथ मूनी हिने चेंडूने स्टंप्स पाडली. रनआऊट होण्यापासून वाचण्यासाठी डेनिएल गिब्सनने जबरदस्त उडी मारली. पर्थच्या क्षेत्ररक्षकांनी आऊटसाठी अपील केले. तिसऱ्या पंचांनी स्लो मोशनमध्ये तपासल्यानंतर गिब्सनला रनआऊट घोषित केले. या तीन रन्स पूर्ण करुन मेग लॅनिंगचे अर्धशतक पूर्ण व्हावे अशी गिब्सनची इच्छा होती, पण तिचा हा प्रयत्न अयशस्वी ठरला.

लॅनिंगचे अर्धशतक हुकले

या थरारानंतर पुढच्याच षटकात स्टार फलंदाज मेग लॅनिंगही बाद झाली. क्लोई एन्सवर्थने टाकलेल्या पहिल्याच चेंडूवर ती झेलबाद झाली आणि 49 धावांच्या वैयक्तिक स्कोअरवर पॅव्हेलियनमध्ये परतली. बेथ मूनीने हा झेल पकडताच पर्थच्या संपूर्ण संघाने जल्लोष करायला सुरुवात केली.

धोनीच्या रनआऊटची आठवण

डेनिएल गिब्सनच्या या रनआऊटने भारतीय क्रिकेट चाहत्यांना थेट एम.एस. धोनीच्या रनआऊटची आठवण करुन दिली. आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2019 मधील उपांत्य फेरीचा सामना भारतीय चाहत्यांसाठी एक वेदनादायक आठवण आहे. 240 धावांचा पाठलाग करताना धोनी (50) आणि रवींद्र जडेजा (77) यांच्या भागीदारीने भारताला सामन्यात परत आणले होते.

डावाच्या 49व्या षटकात, भारताला 9 चेंडूंमध्ये 25 धावांची गरज असताना धोनीने दोन रन घेण्याचा प्रयत्न केला. दुसरी रन पूर्ण करत असताना मार्टिन गुप्टीलने डीप स्क्वेअर लेगवरुन एक उत्कृष्ट थ्रो थेट स्टंप्सवर फेकला. धोनी क्रीजपासून काही इंच दूर राहिला आणि रनआऊट झाला. या रनआऊटने भारताच्या विजयाची शेवटची आशा तोडली आणि भारतीय संघ 18 धावांनी पराभूत झाला. हा क्षण कोट्यवधी भारतीय चाहत्यांसाठी मन हेलावून टाकणारा होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub Fire: 'पळपुटे' लुथरा बंधू सापडले! फुकेटमधून घेतलं ताब्यात, पासपोर्ट निलंबित; गोवा पोलिसांचे मिशन Successful

Goa Live News: हॉटेलच्या टेरेसवरून पडून पश्चिम बंगालच्या 19 वर्षीय कामगाराचा मृत्यू

Goa Nightclub Fire: क्लब मालकाकडून 25 लाख रुपयांचा हफ्ता पोहोचत होता, माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांचा आरोप

Omkar Elephant: ओंकार हत्तीची दोडामार्गात पुन्हा एन्ट्री; बागायतींचे मोठ्या प्रमाणात केलं नुकसान, कळपात परतण्याची शक्यता

ZP Election: डिचोलीत उमेदवारांचे भवितव्य महिला मतदारांच्या हातामध्‍ये! चारही मतदारसंघात 31 हजार 723 मतदार

SCROLL FOR NEXT