क्रिकेटचा बादशाह आणि टीम इंडियाचा धाकड फलंदाज विराट कोहलीने कसोटीतून निवृत्ती घेऊन चाहत्यांना सुखद धक्का दिला. विराटने सोमवारी (12 मे) सोशल मीडियावरील इन्स्टाग्रामवर पोस्ट करत ही निवृत्ती जाहीर केली. त्याच्याआगोदर हिटमॅन म्हणजेच रोहित शर्माने कसोटीतून निवृत्ती जाहीर केली होती. त्याच्यानंतर विराटने कसोटी क्रिकेटला अलविदा केला. विराटचा आक्रमकपणा, फिटनेस नेहमीच चर्चेचा विषय राहिला. चला तर मग विराटच्या फिटनेसविषयी सविस्तररित्या जाणून घेऊया...
विराट हा असा खेळाडू आहे, ज्याच्या फलंदाजी एवढीच त्याच्या लूक आणि फिटनेसची चर्चा होते. त्याने त्याच्या फिटनेसने लाखो लोकांना प्रेरणा दिली. विराटचा आता जसा फिटनेस दिसतो त्याच्यासाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे. जीममध्ये वेळ घालण्यासोबत आहारात (Diet) देखील त्याने अमूलाग्र बदल केला. फिटनेससाठी खाण्याच्या बाबतीत तर त्याने अनेक आवडीच्या खाद्यपदार्थांचा त्याग केला.
दरम्यान, खेळाडू असल्याने विराटला दररोज त्याच्या फिटनेसवर काम करावे लागते. ऊर्जा आणि ताकद टिकवून ठेवण्यासाठी तो आहाराच्या काटेकोर पालनासोबतच कठोर व्यायाम करतो, ज्यामुळे तो फिल्डवर बराच वेळ घालवतो.
विराट त्याच्या फिटनेस रुटीनबद्दल खूप सजग आहे. तो त्याच्या ट्रेनिंगबाबत खूप काटेकोर आहे. मैदानावरील ट्रेनिंगव्यतिरिक्त, तो मैदानाबाहेरील ट्रेनिंगकडेही विशेष लक्ष देतो. त्याच्या दैनंदिन व्यायामाच्या दिनचर्येत पुढील व्यायाम समाविष्ट आहेत-
वेट ट्रेनिंग: विराट वेट ट्रेनिंग करायला विसरत नाही. हे ट्रेनिंग केवळ स्नायूंना बळकटी देत नाही तर हाडे मजबूत करण्यास आणि हृदयाचे आरोग्य (Health) सुधारण्यास मदत करते. विराटने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर वेट ट्रेनिंगचे अनेक व्हिडिओही शेअर केले आहेत.
रनिंग: मैदानावर विराट किती वेगात धावतो तुम्ही पाहिल असेलच ना... तो पायांच्या स्नायूंच्या बळकटीसाठी रनिंग करतो. सुट्टीच्या काळातही तो त्याच्या दिनचर्येत रनिंगचा समावेश करतो, ज्याचे अनेक फायदे आहेत.
लेग एक्सरसाइज: विराट न चुकता लेग लेग एक्सरसाइज करतो, ज्यामुळे पायांचे स्नायू अधिक मजबूत होण्यास आणि शारीरिक कार्यक्षमता सुधारण्यास मदत होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.