Goa Cricket Team Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Vijay Hazare Trophy: झुंझार शतक तरी गमावला सामना! गोव्याच्या गोलंदाजांची हाराकिरी; उत्तराखंडचा 7 विकेट राखून सोपा विजय

Goa Vs Uttarakhand: स्नेहल सहाव्या विकेटच्या रुपात बाद झाल्यानंतर ५.५ षटकांचा खेळ बाकी असताना गोव्याला धावसंख्या वाढविता आली नाही.

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: स्नेहल कवठणकर याच्या झुंझार शतकाच्या बळावर गोव्याने विजय हजारे करंडक लिस्ट ए (एकदिवसीय) क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात उत्तराखंडला विजयासाठी २७१ धावांचे आव्हान दिले. धावसंख्येचे संरक्षण करणे शक्य होते, पण गोलंदाजांची दिशा भरकटल्यामुळे सामना सात विकेट व २२ चेंडू राखून गमवावा लागला.

स्पर्धेच्या एलिट क गटातील सामना शनिवारी जयपूर येथील के. एल. सैनी स्टेडियमवर झाला. स्नेहलचे यंदाच्या स्पर्धेतील दुसरे शतक (१०५) व त्याने डावखुऱ्या अभिनव तेजराणा (५४) याच्यासमवेत पाचव्या विकेटसाठी केलेल्या ११६ धावांच्या भागीदारीमुळे गोव्याने फलंदाजीचे आमंत्रण मिळाल्यानंतर ४९.१ षटकांत सर्वबाद २७० धावा केल्या.

स्नेहलने पदार्पण करणाऱ्या अझान थोटा (३४) याच्यासमवेत दुसऱ्या विकेटसाठी ५९ धावांची भागीदारी केली होती. गोव्याच्या या अनुभवी फलंदाजांने ११४ चेंडूंचा सामना करताना १३ चौकार व एक षटकार मारला. स्नेहल सहाव्या विकेटच्या रुपात बाद झाल्यानंतर ५.५ षटकांचा खेळ बाकी असताना गोव्याला धावसंख्या वाढविता आली नाही.

अखेरच्या चार विकेट संघाने ३० चेंडूंत फक्त ३५ धावांत गमावल्या. गोव्याचा हा सलग दुसरा पराभव ठरला, त्यामुळे पाच लढतीनंतर त्यांचे १२ गुण कायम राहिले. उत्तराखंडने दुसरा विजय नोंदवत गुणसंख्या आठवर नेली.

संक्षिप्त धावफलक

गोवा ः ४९.१ षटकांत सर्वबाद २७० (अर्जुन तेंडुलकर ८, स्नेहल कवठणकर १०५, अझान थोटा ३४, सुयश प्रभुदेसाई १, ललित यादव ७, अभिनव तेजराणा ५४, दीपराज गावकर २५, दर्शन मिसाळ ३, राजशेखर हरिकांत ७, शुभम देसाई ५, वासुकी कौशिक नाबाद २, अभय नेगी ३-५०, जे. सुचित ३-५४) पराभूत वि. उत्तराखंड ः ४६.२ षटकांत ३ बाद २७४ (प्रियांशू बर्सवाल ४४, कुणाल चंडेला ३३, शाश्वत डांगवाल नाबाद ७०, आंजनेय सूर्यवंशी नाबाद ११५, वासुकी कौशिक ८-०-२८-१, अर्जुन तेंडुलकर ८-०-५४-०, दीपराज गावकर ९-०-५७-०, ललित यादव १०-०-५०-०, दर्शन मिसाळ ७-०-५३-१, शुभम देसाई ४.२-०-३०-१).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Cyber Crime: 1.41 कोटींचा गंडा! नागपूरच्या 23 वर्षीय 'मास्टरमाईंड'ला गोवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या; फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावाखाली वाळपईच्या एकाला लुटलं

Panchank Rajyog 2026: धनु राशीत मंगल-वरुणचा मिलाफ! 'पंचांक योग' उजळवणार 'या' 3 राशींचं नशीब; 7 जानेवारीपासून सुवर्णकाळ

"उद्या भारतासोबतही असं घडू शकतं..."; निकोलस मादुरोंच्या अपहरण प्रकरणावर काँग्रेस नेत्याचं मोठं वक्तव्य; सोशल मीडियावर पेटला वाद VIDEO

Kartik Aaryan: गोव्यातील सुट्ट्या अन् आता स्नॅपचॅट वाद! कार्तिक आर्यनच्या 'त्या' व्हायरल स्क्रीनशॉटने खळबळ; काय नेमकं प्रकरण?

मोपा विमानतळावरील वाहन प्रवेश शुल्कावरून 'GMR'ला शो-कॉज नोटीस; 7 दिवसांत मागितला खुलासा

SCROLL FOR NEXT