GFA Election Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

GFA Election: गोमंतकीय फुटबॉलची धुरा प्रथमच महिलेच्या हाती! वालंका आलेमाव यांचा ऐतिहासिक विजय

Valanka Alemao GFA President Election: पुढील चार वर्षे राज्यातील फुटबॉलची प्रशासकीय धुरा महिलेच्या हाती असेल. चार वर्षांपूर्वी कायतानकडून झालेल्या भावाच्या पराभवाचा त्यांनी वचपा काढला.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: गोवा फुटबॉल असोसिएशनच्या (जीएफए) निवडणुकीत २०२२ मध्ये उद्योजक कायतान फर्नांडिस यांनी ८३ मते मिळवून अध्यक्षपदी येण्याचा पराक्रम साधला होता, चार वर्षांनंतर त्यांना कडवे आव्हान देत वालंका आलेमाव यांनीही ८३ मते मिळवून संघटनेच्या पहिल्या महिला अध्यक्ष बनण्याचा इतिहास रचला.

पुढील चार वर्षे राज्यातील फुटबॉलची प्रशासकीय धुरा महिलेच्या हाती असेल. चार वर्षांपूर्वी कायतानकडून झालेल्या भावाच्या पराभवाचा त्यांनी वचपा काढला. ताळगाव येथे मंगळवारी संध्याकाळी ‘जीएफए’ची निवडणूक झाली. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत थेट निवडणूक झाली. वालंका यांच्यावर १६० पैकी बहुसंख्य क्लब प्रतिनिधींनी विश्वास दाखविला. त्यामुळे त्यांना १६ मतांच्या फरकाने विजय मिळविता आला. मावळते अध्यक्ष कायतान यांना ६७ मते मिळाली, तर १० मते अवैध ठरली.

वालंका यांच्यासाठी ‘प्रथमायोग’

२०२२ मध्ये अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या सदस्य बनणाऱ्या पहिल्या महिला

जागतिक फुटबॉल महासंघाच्या (फिफा) महिला फुटबॉल समितीत स्थान मिळवणारी पहिली भारतीय महिला

१९५९ मध्ये गोवा फुटबॉल संघटनेची स्थापना, २०२६ मध्ये प्रथमच महिला अध्यक्ष

हा गोमंतकीय फुटबॉलचा विजय आहे. चर्चिल आलेमाव यांनी गोमंतकीय फुटबॉलसाठी जे काही केले आहे, त्यावर विश्वास दाखविणाऱ्या क्लबचा हा विजय आहे. हा विजय पारदर्शकता आणि जबाबदारीसाठी आहे. हा विजय गोमंतकीय लोकांचा असून राज्यातील फुटबॉल पुन्हा पुनरुज्जीवित करण्यासाठी आहे. तीन दिवसांत सर्वांनी मेहनत घेतली, त्यामुळेच हा विजय साध्य झाला.

- वालंका आलेमाव, नवनिर्वाचित अध्यक्ष, गोवा फुटबॉल असोसिएशन.

Girl Hair Stuck in Gearbox: गोव्यात फेरीबोटीत थरार! हायड्रोलिक गिअर बॉक्समध्ये अडकले दहावीच्या विद्यार्थिनीचे केस

E20 Petrol: पेट्रोलमध्ये 20 टक्क्यांपेक्षा जास्त इथेनॉल मिसळणार? केंद्रीय मंत्री हरदीप पुरी यांनी स्पष्टच सांगितले!

BJP Election Preparation 2027: गोव्यात 50 टक्क्यांहून अधिक मतांचे लक्ष्य! भाजपला पुन्हा सत्तेत आणण्यासाठी नितीन नवीन यांचा कार्यकर्त्यांना 'बुस्ट'

Abhishek Sharma Century: अभिषेक शर्माचा रौद्रावतार! 10 षटकार अन् 8 चौकारांसह ठोकलं शानदार शतक; न्यूझीलंडच्या गोलंदाजांची उडाली दाणादाण

1 November Rules Change: गॅस सिलिंडरपासून पेन्शनपर्यंत! 1 नोव्हेंबरपासून बदलणार 6 महत्त्वाचे नियम; सर्वसामान्यांच्या खिशावर होणार थेट परिणाम

SCROLL FOR NEXT