Goa Cricket Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Cricket Tournament: दुबळ्या अरुणाचलवर गोव्याचा विजय; शदाब खानच्या किफायती गोलंदाजीसह 5 विकेट

Goa Cricket Tournament 2024-25: गोव्याच्या २३ वर्षाखालील क्रिकेट संघाने सलग तीन पराभवानंतर सोमवारी एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत पहिला विजय नोंदविला.

गोमन्तक डिजिटल टीम

Arunachal Pradesh Vs Goa Cricket Match

पणजी: गोव्याच्या २३ वर्षाखालील क्रिकेट संघाने सलग तीन पराभवानंतर सोमवारी एकदिवसीय सामन्यांच्या स्पर्धेत पहिला विजय नोंदविला. त्यांनी ड गटातील लढतीत दुबळ्या अरुणाचल प्रदेशवर नऊ विकेट राखून सहज मात केली.

छत्तीसगडमधील भिलाई येथे झालेल्या सामन्यात गोव्याने नाणेफेक जिंकून अरुणाचल प्रदेशला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. गोव्याच्या प्रभावी गोलंदाजीसमोर अरुणाचल प्रदेश डाव ९६ धावांत संपुष्टात आला. गोव्याचा फिरकी गोलंदाज शदाब खान याने ९.३ षटकात फक्त वीस धावा देताना पाच गडी बाद केले. याशिवाय अमित यादव व मनीष काकोडे यांनी प्रत्येकी दोन फलंदाज बाद केले.

विजयासाठीचे ९७ धावांचे आव्हान गोव्याने आरामात पार केले. त्यांनी १३.४ षटकात एक गडी गमावून आवश्यक धावा नोंदविल्या. गौरेश कांबळे यांनी ४५ धावा करताना देवनकुमार चित्तेम यांच्यासमवेत ६३ धावांची सलामी दिली. गौरेश बाद झाल्यानंतर देवनकुमार आणि आयुष वेर्लेकर यांनी विजयाची औपचारिकता पूर्ण केली.

संक्षिप्त धावफलक ः अरुणाचल प्रदेश ः ३६.३ षटकांत सर्वबाद ९६ (टिक ली ११, हर्ष यादव १४, हर्ष पांडे २७, शिवम प्रताप सिंग ४-०-१८-०, अमित यादव ७-२-२६-२, मनीष काकोडे १०-३-१५-२, शदाब खान ९.३-१-२०-५, यश कसवणकर ६-०-१३-१) पराभूत वि. गोवा ः १३.४ षटकांत १ बाद ९७ (गौरेश कांबळी ४५, देवनकुमार चित्तेम नाबाद ३५, आयुष वेर्लेकर नाबाद १४, मिंदू त्सेरिंग १-१६).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT