Goa Cricket|Karnataka Tour Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Goa Cricket: फलंदाजांच्या तडाख्यासमोर गोव्याच्या गोलंदाजांची हाराकिरी; मध्य प्रदेशचा धावांचा डोंगर

Thimmappiah Cricket Tournament: मध्य प्रदेशचा सलामी फलंदाज शुभ्रांशू सेनापती याने १७७ धावा केल्या, पहिला डाव ७ बाद ५६६ धावांवर घोषित

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: मध्य प्रदेशच्या फलंदाजांनी निर्विवाद वर्चस्व राखत धावपर्वत रचताना पहिला डाव ७ बाद ५६६ धावांवर घोषित केला. त्यांच्या तडाख्यासमोर गोव्याचे निष्प्रभ गोलंदाज मेटाकुटीस आले.

कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या डॉ. कॅप्टन के. थिम्मापिया मेमोरियल क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसअखेर गुरुवारी गोव्याने सलामीच्या सुयश प्रभुदेसाई याला गमावून २९ धावा केल्या होत्या.

मध्य प्रदेशने सामन्याच्या पहिल्या दिवशी बुधवारी २ बाद ३०२ धावा केल्या होत्या, तोच धडाका त्यांनी गुरुवारीही कायम राखला. त्यामुळे प्रतिस्पर्धी फलंदाज चुका करतील या अपेक्षेपलीकडे गोव्याचे गोलंदाज काहीच करू शकले नाहीत. मध्य प्रदेशचा सलामी फलंदाज शुभ्रांशू सेनापती याने कालच्या १३६ धावांवरून आज १७७ धावा केल्या. त्याने ३६३ चेंडूंतील खेळीत १७ चौकार व २ षटकार मारले.

कालची नाबाद जोडी शुभ्रांशू सेनापती व कुमार कार्तिकेय (६०) याने तिसऱ्या विकेटसाठी १०५ धावांची भागीदारी केली. जम बसलेल्या शुभ्रांशूला मोहित रेडकरने रोहन कदम याच्याकरवी झेलबाद केले, नंतर कार्तिकेय धावबाद झाल्यानंतर करण तेहलियानी लगेच बाद झाला. ३५ धावांत तीन गडी बाद केल्यामुळे गोव्याच्या संघात खुशी होती, पण नंतर हरप्रीत सिंग (५७) व रिषभ चौहान (७८) यांनी गोव्याच्या दमलेल्या गोलंदाजांवर पुन्हा हल्ला चढविला, त्यामुळे त्यांना साडेपाचशे धावा पार करणे शक्य झाले. रिषभने ७९ चेंडूतील आक्रमक खेळीत सहा षटकार व तेवढेच चौकार मारले.

गोव्याचे सारेच गोलंदाज महागडे ठरले. मोहित रेडकरला तीन विकेटसाठी १५२ धावा, तर दर्शन मिसाळला दोन विकेटसाठी १२६ धावा मोजव्या लागल्या.

संक्षिप्त धावफलक

मध्य प्रदेश, पहिला डाव (२ बाद ३०२ वरून) ः १६६.३ षटकांत ७ बाद ५६६ घोषित (शुभ्रांशू सेनापती १७७, कुमार कार्तिकेय ६०, हरप्रीत सिंग ५७, करण तेहलीयानी ३, रिषभ चौहान ७८, आर्यन पांडे नाबाद १९, हेरंब परब २९-६-६७-१, शुभम तारी ५.५-२-१४-०, दर्शन मिसाळ ३१.४-४-१२६-२, मोहित रेडकर ३६-४-१५२-३, दीपराज गावकर २०-३-६४-०, कीथ पिंटो ३९-७-१०५-०, सुयश प्रभुदेसाई ५-१-२२-०).

गोवा, पहिला डाव ः ११ षटकांत १ बाद २९ (रोहन कदम नाबाद १२, सुयश प्रभुदेसाई ८, अभिनव तेजराणा नाबाद ६, अनुभव अग्रवाल १-९).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT