Goa Cricket News Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Thimmappiah Tournament: ..पुन्हा तेंडुलकरने सावरले! गोव्याच्या फलंदाजांची घसरगुंडी; द्विशतकी आघाडीमुळे स्थिती भक्कम

Goa VS KSCA: डॉ. (कॅप्टन) के. थिम्माप्पिया स्मृती क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य लढतीच्या तिसऱ्या दिवसअखेर मंगळवारी गोव्याने दुसऱ्या डावात ८ बाद १६८ धावा केल्या.

Sameer Panditrao

पणजी: पहिल्या डावात ६२ धावांची आघाडी घेतल्यानंतर गोव्याची दुसऱ्या डावात घसरगुंडी उडाली, तरीही द्विशतकी आघाडीमुळे त्यांची स्थिती भक्कम असून यजमान कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (केएससीए) सचिव संघाविरुद्ध सामन्याचा अखेरचा चौथा दिवस निर्णायक असेल.

डॉ. (कॅप्टन) के. थिम्माप्पिया स्मृती क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य लढतीच्या तिसऱ्या दिवसअखेर मंगळवारी गोव्याने दुसऱ्या डावात ८ बाद १६८ धावा केल्या. त्यांच्यापाशी आतापर्यंत २३० धावांची आघाडी जमा झाली आहे. सामन्याचा बुधवारी अखेरचा दिवस आहे. दिवसअखेर अर्जुन तेंडुलकर २५, तर समर दुभाषी १४ धावांवर खेळत होता. त्यांनी नवव्या विकेटसाठी ४० धावांची अभेद्य भागीदारी केली आहे.

संक्षिप्त धावफलक : गोवा, पहिला डाव : ३३८ व दुसरा डाव : ७३ षटकांत ८ बाद १६८ (अभिनव तेजराणा २०, मंथन खुटकर २२, कश्यप बखले ०, ईशान गडेकर १४, स्नेहल कवठणकर १८, ललित यादव २७, दर्शन मिसाळ १५, मोहित रेडकर २, अर्जुन तेंडुलकर नाबाद २५, समर दुभाषी नाबाद १४, अभिषेक अहलावत ४-६३, माधव बजाज २-५१, पी. ध्रुव २-२२).

केएससीए सचिव संघ, पहिला डाव (८ बाद २४५ वरून) : ९७.१ षटकांत सर्वबाद २७६ (कृतिक कृष्णा ९५, अर्जुन तेंडुलकर ३-५४, वासुकी कौशिक २-३२, दर्शन मिसाळ १-६२, मोहित रेडकर २-७४, ललित यादव ०-२७, अभिनव तेजराणा १-१४).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरा ‘मास्टर माइंड’ मोकाट, अटक केलीये ते भाडोत्री गुंड! वेन्झींचे आरोप; गोवा बंद करण्याचा दिला इशारा

GST Rates: गोव्‍यात 117 दुकानांची प्रत्‍यक्ष पाहणी, विक्रेत्‍यांनी लावले फलक; जीएसटी कपातीच्‍या निर्णयाची होतेय अंमलबजावणी

Chorao Ferryboat: ..नदीत अचानक फेरीबोट पडली बंद! 2 तास खोळंबा; स्थानिक होड्यांच्या मदतीने प्रवाशांना आणले किनाऱ्यावर

Love Horoscope: सिंगल लोकांना मिळेल प्रेमाची साथ, आजचा दिवस तुमच्यासाठी खास! शुक्राच्या कृपेने होणार बदल; वाचा भविष्य

Damu Naik: 'प्रेम असते, तेथेच भांडण असते'! तवडकर- गावडे विषयावरती दामूंची प्रतिक्रिया; वाद संपल्याचा केला दावा

SCROLL FOR NEXT