10 लाखांचं 800 लिटर अवैध डिझेल जप्त, 5 जणांच्या आवळल्या मुसक्या; मांडवी किनारी गोवा पोलिसांकडून मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश

800 Litres diesel Seized: तिसवाडी येथील सांत इस्तेव्ह आखाडा (St. Estevem, Akhada) भागातील मांडवी नदीच्या किनाऱ्याजवळ हे डिझेल साठवून ठेवले होते.
800 Litres diesel Seized
ArrestCanva
Published on
Updated on

Goa Illegal Diesel: गोवा पोलिसांनी मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला. पोलिसांनी तब्बल 800 लिटर अवैध डिझेल जप्त केले. तिसवाडी येथील सांत इस्तेव्ह आखाडा (St. Estevem, Akhada) भागातील मांडवी नदीच्या किनाऱ्याजवळ हे डिझेल साठवून ठेवले होते आणि त्याची वाहतूक करण्याची तयारी सुरु होती. याचदरम्यान पोलिसांनी ही कारवाई केली. पोलिसांनी या कारवाईत तब्बल 10 लाख किमतीचे डिझेल, एक छोटी बोट (Canoe) आणि डिझेलची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येणारे बोलेरो पिक-अप (GA-06-T-5166) जप्त केले. याशिवाय, पाच जणांच्या मुसक्याही पोलिसांनी आवळल्या.

पाच आरोपींना अटक

पोलिसांनी घटनास्थळावरुन पाच आरोपींना ताब्यात घेतले. हे आरोपी गोवा आणि उत्तर प्रदेशसह विविध भागांतील रहिवासी आहेत.

  1. अजय सावंत (आखाडा, सांता इस्तेव्ह)

  2. सिद्धान गौडा (झुआरीनगर, मडगाव)

  3. हाकीम ए. खान (वास्को-द-गामा)

  4. गोपाळ नाईक (आखाडा, सांत इस्तेव्ह)

  5. गुड्डू राजभर (उत्तर प्रदेश)

या अवैध डिझेलची समुद्रमार्गे वाहतूक होणार होती किंवा गोव्यातील किनारी भागांमध्ये त्याची विक्री होणार होती, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

800 Litres diesel Seized
Goa Police: पोलिसांची राज्यभर नाकाबंदी मोहीम, 2972 वाहनांची तपासणी; 35 जण प्रतिबंधात्मक अटकेत

पोलिसांचे पथक

दरम्यान, ही संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक (PI) अजित आर. उमरे आणि त्यांच्या पथकाने तटवर्ती पोलीस दलाचे अधीक्षक (SP Coastal) राजू राऊत देसाई यांच्या देखरेखीखाली केली.

कारवाई करणाऱ्या पथकात पीआय अजित आर. उमरे यांच्यासह एएसआय कार्लोस एफ. पॉन्टेस, हवालदार सूर्यकांत बोरडेकर, हवालदार लीलाधर एन. गावडे, हवालदार रजनीकांत गावडे, पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मीकांत कौठणकर, एएसआय ड्रायव्हर मिलिंद सावंत आणि एस रजनीकांत फडते यांचा समावेश होता. पोलिसांनी सर्व जप्तीची प्रक्रिया पंचनाम्याद्वारे (Panchanama) पूर्ण केली.

किनारपट्टी सुरक्षा पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे गोव्यातील (Goa) किनारी भागांमध्ये होणाऱ्या अवैध इंधनाच्या साठवणुकीला व वाहतुकीला मोठा दणका बसला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com