Syed Mushtaq Ali Trophy Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Syed Mushtaq Ali Trophy: गोव्याचे पराभवासह आव्हान संपुष्टात, टी-20 अखेरच्या साखळी लढतीत महाराष्ट्राचा 15 धावांनी विजय

Syed Mushtaq Ali Trophy Maharashtra vs Goa: सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत एलिट ब गटातून सुपर लीग फेरी गाठण्यासाठी गोव्याने महाराष्ट्राला अखेरच्या साखळी लढतीत पराभूत करणे गरजेचे होते, पण त्यांना १६२ धावांचे लक्ष्य गाठणे शक्य झाले नाही.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० क्रिकेट स्पर्धेत एलिट ब गटातून सुपर लीग फेरी गाठण्यासाठी गोव्याने महाराष्ट्राला अखेरच्या साखळी लढतीत पराभूत करणे गरजेचे होते, पण त्यांना १६२ धावांचे लक्ष्य गाठणे शक्य झाले नाही. सामना १५ धावांनी गमावल्यामुळे आव्हान संपुष्टात आले.

सॉल्ट लेक-कोलकाता येथील जेयू सेकंड कँपस मैदानावर सोमवारी सामना झाला. गोव्याने प्रथम फलंदाजीस पाचारण केल्यानंतर महाराष्ट्राने राहुल त्रिपाठी याच्या आक्रमक नाबाद ८३ धावांमुळे ७ बाद १६१ धावा केल्या. तीन मोसमापूर्वी गोव्याकडून खेळलेल्या त्रिपाठीने ४४ चेंडूंतील खेळीत पाच षटकार व तेवढेच चौकार मारले.

आव्हानाला सामोरे जाताने गोव्याने बिनीचे चार गडी ३० धावांत गमावले, अनुभवी फिरकी गोलंदाज जलज सक्सेना (३-२२) गोव्याच्या फलंदाजांना भारी ठरला. फॉर्ममधील कश्यप बखले (३) व कर्णधार सुयश प्रभुदेसाई (१) खूपच लवकर बाद होणे गोव्यासाठी मोठे धक्कादायक ठरले.

नंतर फटकेबाजी करणाऱ्या दर्शन मिसाळ (३१, १८ चेंडू, २ चौकार, २ षटकार) याला विकी ओस्तवाल याने त्रिपाठीच्या हाती झेल देण्यात भाग पाडले आणि गोव्याची ५ बाद ६८ अशी स्थिती झाली. पाहुणा ललित यादव याने विकास सिंग याच्यासमवेत संघाला सावरले. या दोघांची सहाव्या विकेटची ६० धावांची भागीदारी संपुष्टात आणताना डावखुरा फिरकी गोलंदाज ओस्तवाल याने विकास सिंगला बाद झाले.

त्यानंतर ओस्तवाल (३-२३) व मध्यमगती तनय संघवी (३-२३) यांनी गोव्याची स्थिती ८ बाद १३२ अशी करुन महाराष्ट्राचा विजय पक्का केला. जम बसलेल्या ललित यादव (४९, ३८ चेंडू, ५ चौकार, १ षटकार) याच्यासह तीन फलंदाज चार धावांत गमावणे गोव्याला महागात पडले.

संक्षिप्त धावफलक

महाराष्ट्र ः २० षटकांत ७ बाद १६१ (अर्शिन कुलकरणी १४, यश नहार १८, राहुल त्रिपाठी नाबाद ८३, रणजीत निकम १४, वासुकी कौशिक ४-०-२०-३, शुभम तारी ४-०-४४-०, हेरंब परब ३-०-३१-२, दर्शन मिसाळ ४-०-२६-१, दीपराज गावकर ४-०-२०-१, विकास सिंग १-०-१४-०) वि. वि. गोवा ः १९.३ षटकांत सर्वबाद १४६ (कश्यप बखले ३, दीपराज गावकर १२, अभिनव तेजराणा १०, सुयश प्रभुदेसाई १, ललित यादव ४९, दर्शन मिसाळ ३१, विकास सिंग १९, राजशेखर हरिकांत ०, हेरंब परब नाबाद ३, शुभम तारी १, वासुकी कौशिक ११, जलज सक्सेना ४-०-२२-३, तनय संघवी ३.३-०-२३-३, विकी ओस्तवाल ४-०-२७-३).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: विजय सरदेसाई, अमित पाटकर यांच्यामुळे युती तुटली; आरजीच्या मनोज परब यांचा आरोप

Goa Nightclub Fire: 'आग लागली तेव्हा आम्ही नव्हतो!' लुथरा बंधूंचा लंगडा युक्तिवाद, दिल्ली कोर्टाचा दिलासा देण्यास नकार; 'गोव्याचे उत्तर' ठरणार निर्णायक

Serendipity Arts Festival Goa: कला आणि संस्कृतीचा गोव्यात महासंगम! 12 ते 21 डिसेंबरदरम्यान सेरेन्डिपिटी आर्ट्स फेस्टिव्हल

Goa Nightclub Fire: गोवा नाईट क्लब आग प्रकरण! दोषींवर कठोर कारवाई होणारच; मुख्यमंत्री सावंत आक्रमक

बेळगावचे विभाजन होणार? नवीन तीन जिल्हे निर्माण करण्याची मागणी; अधिवेशनात चर्चा

SCROLL FOR NEXT