Vaibhav Suryavanshi Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

अर्जुन तेंडुलकरविरुद्ध वैभवनं आक्रमक फलंदाजी केली, पण बिहार हरला; धमाकेदार सामन्यात गोव्याने नोंदवला शानदार विजय!

Goa Beat Bihar: वैभवने चांगली सुरुवात करुन दिली असली तरी, बिहार संघाला मात्र या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.

Manish Jadhav

Goa Beat Bihar: भारतीय क्रिकेटमधील उदयोन्मुख तारा आणि बिहार संघाचा 14 वर्षीय युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2025 मध्ये पुन्हा एकदा आपल्या बॅटने आक्रमक शैलीचे प्रदर्शन केले. गोवा संघाविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात वैभव सूर्यवंशीच्या बॅटमधून 46 धावांची विस्फोटक खेळी पाहायला मिळाली.

पहिल्यांदाच या प्रतिष्ठित टी-20 स्पर्धेत खेळणाऱ्या वैभवसाठी सुरुवातीचे तीन सामने फारसे खास ठरले नव्हते, पण त्याने चौथ्या सामन्यात शतकी खेळी करत आपली क्षमता दाखवून दिली होती. आता गोवाविरुद्ध त्याने पुन्हा एकदा मोठी खेळी करत निवडकर्त्यांचे लक्ष वेधले. पण तो बिहार संघाला गोव्याविरुद्ध विजय मिळवून देऊ शकला.

अर्जुन तेंडुलकरविरुद्धही आक्रमक पवित्रा

एलीट ग्रुप-बी मधील बिहार आणि गोवा यांच्यातील हा सामना कोलकाता येथील जाधवपूर युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये खेळला गेला. या सामन्यात गोवा संघाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बिहारकडून सलामीला आलेल्या वैभव सूर्यवंशीने कर्णधार शकीबुल गनीच्या साथीने पहिल्या काही षटकांमध्ये वेगाने धावा काढण्यास सुरुवात केली. या सामन्यात गोवा संघाकडून खेळणाऱ्या अर्जुन तेंडुलकर याच्याविरुद्धही वैभवने आपला आक्रमक पवित्रा कायम ठेवला. त्याने गोलंदाजांवर दबाव आणत जलद धावा केल्या.

वैभव आपली खेळी फार मोठी करु शकला नाही, पण त्याने 25 चेंडूंमध्ये 46 धावा काढून संघाला चांगली सुरुवात करुन दिली. त्याने 184 च्या उत्कृष्ट स्ट्राईक रेटने धावा केल्या, ज्यात चार चौकार आणि चार उत्तुंग षटकारांचा समावेश होता.

बिहार संघाला पुन्हा पराभवाचा सामना

वैभवने चांगली सुरुवात करुन दिली असली तरी, बिहार संघाला मात्र या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. पहिल्यांदा फलंदाजी करताना बिहारच्या संघाने 20 षटकांमध्ये 7 गडी गमावून 180 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरादाखल, गोवा संघाने हे लक्ष्य 19.5 षटकांमध्ये 5 गडी गमावून पूर्ण केले आणि 5 विकेट्सने विजय मिळवला. गोवा संघाच्या विजयात कर्णधार सुयश प्रभुदेसाई याने मोलाची भूमिका बजावली. त्याने 46 चेंडूंमध्ये 79 धावांची शानदार खेळी खेळली.

बिहारसाठी पुढील मार्ग कठीण

गोवाविरुद्धच्या (Goa) या पराभवानंतर बिहार संघासाठी सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीच्या पुढील फेरीत स्थान मिळवणे आता खूपच कठीण झाले आहे. एलीट ग्रुप-बी च्या गुणतालिकेत बिहार संघाने आतापर्यंत 5 सामने खेळले आहेत आणि त्यांना या पाचही सामन्यांमध्ये पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे ते गुणतालिकेत सर्वात शेवटच्या स्थानावर आहेत.

बिहार (Bihar) संघाचा प्रवास कठीण असला तरी, 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने आपल्या फलंदाजीने भविष्यासाठी मोठी आशा निर्माण केली. त्याने या स्पर्धेत एक शतक आणि एक महत्त्वपूर्ण अर्धशतकी खेळीच्या जवळ पोहोचणारी खेळी खेळून आपले आगळेवेगळे स्थान निर्माण केले. वैभवच्या या खेळीमुळे त्याच्या नावावर युवा क्रिकेटपटूंच्या यादीत लवकरच उच्च स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्याचे लक्ष आता पुढील टी-20 सामन्यांमधील कामगिरीवर असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mumbai-Goa Highway: मुंबई-गोवा महामार्ग कधी होणार पूर्ण होणार? नितीन गडकरींनी संसदेत केली मोठी घोषणा; कोकणवासीयांचा वनवास संपणार!

Goa Drug Bust: शिवोलीतील फुटबॉल मैदानाजवळ 7.90 लाखांचं ड्रग्ज जप्त, रत्नागिरीच्या 25 वर्षीय तरुणाला अटक; गोवा पोलिसांची मोठी कारवाई!

'ऑलिम्पिकसाठी गोव्याला सज्ज करा'! रॅकेट खेळांसाठी 'उत्कृष्टता केंद्र' स्थापन करण्याची खासदार तानावडेंची राज्यसभेत मागणी

IndiGo Share Market Loss: विमानं रद्द करणं इंडिगोला पडलं महागात! एका दिवसात तब्बल 7160 कोटींचा फटका, बाजारमूल्यात मोठी घसरण

Goa Politics: 'त्या 11 जागांवर युतीची चर्चाच नव्हती', अमित पाटकरांचा 'धक्कादायक' खुलासा! काँग्रेस आणि आरजीपीमध्ये विस्फोट?

SCROLL FOR NEXT