Goa Professional League Football Tournament Canva
गोंयचें खेळामळ

Professional League Tournament: पिछाडीनंतर स्पोर्टिंग क्लबचा 'विजयी कमबॅक'; चर्चिल ब्रदर्सचा २-१ फरकाने पराभव

Professional League Football Tournament: गतविजेत्या स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाने प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत एका गोलच्या पिछाडीवरून विजयाची नोंद केली

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गतविजेत्या स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाने प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत एका गोलच्या पिछाडीवरून विजयाची नोंद केली. अखेरची नऊ मिनिटे दहा खेळाडूंसह खेळणाऱ्या चर्चिल ब्रदर्सला त्यांनी २-१ फरकाने हरविले. सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला.

ज्योबर्न कार्दोझ याने दहाव्या मिनिटास केलेल्या गोलमुळे चर्चिल ब्रदर्सने आघाडी घेतली. सामन्याच्या ५८व्या मिनिटास कुणाल कुंडईकरच्या गोलमुळे स्पोर्टिंग क्लबने बरोबरी साधली. नंतर ८३व्या मिनिटास बदली खेळाडू विक्रम व्यंकटचलम याच्या गोलमुळे स्पोर्टिंग क्लबपाशी आघाडी जमा झाली.

यावेळी कुणाल कुंडईकरचा फटक्यावर चेंडू विक्रमच्या पायाला चाटून गोलनेटमध्ये गेला. त्यापूर्वी ८१व्या मिनिटास सामन्यातील दुसऱ्या यलो कार्डमुळे ट्रिजॉय डायस याला रेड कार्डसह मैदान सोडावे लागले. त्यामुळे बाकी कालावधीत चर्चिल ब्रदर्सला दहा खेळाडूंसह खेळावे लागले. याचा लाभ स्पोर्टिंग क्लबने घेतला.

चर्चिल ब्रदर्सने सामन्याच्या सुरवातीसच जल्लोष केला. लुनमिन्लेन हाओकिप याने स्पोर्टिंगच्या बचावफळीत खिंडार पाडल्यानंतर गोल करण्याचे काम ज्योबर्न याने चोखपणे बजावले. तासाभराच्या खेळापर्यंत गतविजेते पिछाडीवर राहिले. उत्तरार्धात स्पोर्टिंगने गोलसाठी प्रयत्न केले, पण संधी हुकल्या. अखेरीस कुणालच्या डाव्या बगलेतील ताकदवान क्रॉस फटक्याने त्यांना बरोबरीसाधून दिली. .

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सा जुझे दी आरियाल पुन्हा चर्चेत; पंचायत समोरील संत जोसेफ यांच्या पुतळ्याची विटंबना करुन चोरी

'पाठीत खंजीर खुपसला पण काँग्रेससोबत एकत्र लढण्यास तयार'; आप नेते पालेकरांचे काँग्रेस नेत्यांना चर्चेचे आवाहन

India vs Pakistan: पाकड्यांचा पराभव अटळ! हेड-टू-हेड आकडेवारीत टीम इंडियाचा वरचष्मा, सूर्याची 'ब्लू आर्मी' करणार कमाल

Sanquelim Market Robbery: फसवणुकीचा नवा फंडा! साखळीत वृद्ध भाजीविक्रेत्या महिलेला दिवसाढवळ्या लुबाडले, लंपास केली सोन्याची पाटली आणि साखळी

Sonam Wangchuck Arrested: लेह हिंसाचारानंतर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना 'NSA' अंतर्गत अटक

SCROLL FOR NEXT