I League 2025 Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

I-League 2025: घरच्या मैदानावर स्पोर्टिंग गोवाचा दबदबा, नेरोका एफसीविरुद्ध नोंदवला शानदार विजय

Sporting Club de Goa vs Neroca FC: स्पोर्टिंग क्लब द गोवाच्या विजयात डॉयल अल्वीस याने १५व्या, ज्योएल कुलासो याने २३व्या, तर न्गांगबाम नाओचा सिंग याने ४६व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला.

गोमन्तक डिजिटल टीम

Sporting Club de Goa Secures 3-0 Win Over Neroca FC in I-League 2

पणजी: स्पोर्टिंग क्लब द गोवा संघाने आय-लीग २ फुटबॉल स्पर्धेत घरच्या मैदानावर सलग दुसरा विजय नोंदविताना मंगळवारी इंफाळ-मणिपूर येथील नेरोका एफसीवर ३-० फरकाने मात केली. सामना एला-जुने गोवे येथील मैदानावर झाला.

स्पोर्टिंग क्लब द गोवाच्या विजयात डॉयल अल्वीस याने १५व्या, ज्योएल कुलासो याने २३व्या, तर न्गांगबाम नाओचा सिंग याने ४६व्या मिनिटास प्रत्येकी एक गोल केला. याच मैदानावर स्पोर्टिंग गोवाने मागील लढतीत ट्राऊ एफसीला १-० फरकाने पराभूत केले होते.

लागोपाठच्या दुसऱ्या आणि एकंदरीत तिसऱ्या विजयामुळे स्पोर्टिंग क्लब द गोवाचे आता सहा सामन्यांतून दहा गुण झाले असून ते चौथ्या क्रमांकावर आले आहेत. नेरोका एफसीला तिसरा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे ते सात गुणांसह सातव्या स्थानी राहिले. स्पोर्टिंग गोवाचा पुढील सामना दोन मार्च रोजी केरळमधील (Kerala) मांजेरी येथील पय्यानाड स्टेडियमवर एसएटी तिरुर संघाविरुद्ध होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Airstrikes Yemen Houthis: शेवटच्या मिनिटाला ऑर्डर बदलली! ट्रम्प यांनी अचानक का रोखला हूती बंडखोरांवरील लष्करी हल्ला? मध्य पूर्वेत महायुद्धाची ठिणगी पडता पडता वाचली

US Bank Layoffs: 5 मिनिटांचा गुगल मीट कॉल अन् 80 भारतीय कर्मचाऱ्यांना डच्चू! वर्क फ्रॉम होम सांगून अमेरिकन बँकेनी केली हकालपट्टी; कॉर्पोरेट जगतात खळबळ

Indian Foreign Policy: शेजारी देशांना एकाच पारड्यात तोलणे भारतासाठी धोक्याचे? पाकिस्तान-बांगलादेश संबंधांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत राजकारणासमोरील मोठा सवाल

Asian Games 2026: भारतीय महिला हॉकी संघाचा वादळी विजय! इंडोनेशियाला 17-1 ने चिरडत पुढील फेरीत धडक; 'गोल्ड'वर भारताचा निशाणा

Valpoi Stray Dogs Survey: वाळपईत भटके कुत्रे, पाळीव कुत्रे अन् मोकाट जनावरांचे सर्वेक्षण; 25 सप्टेंबरपर्यंत माहिती देण्याचे पालिकेचे आवाहन

SCROLL FOR NEXT