Manolo Marquez  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Manolo Marquez: भारतीय फुटबॉल संघाचा प्रशिक्षक बनणे 'स्वप्नपूर्ती'; मानोलो मार्केझ

All India Football federation Coach: अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना भेटून आवश्यक तांत्रिक बाबींची पूर्तता

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: भारतीय फुटबॉल संघाचा प्रशिक्षक बनणे आपली ‘स्वप्नपूर्ती’ असल्याचे मत नवे मार्गदर्शक स्पॅनिश मानोलो मार्केझ यांनी व्यक्त केले. गेल्या महिन्यात राष्ट्रीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी रविवारी अखिल भारतीय फुटबॉल महासंघाच्या (एआयएफएफ) प्रमुख पदाधिकाऱ्यांना भेटून आवश्यक तांत्रिक बाबींची पूर्तता केली.

२०२४-२५ मोसमात ५५ वर्षीय मार्केझ यांच्याकडे दुहेरी जबाबदारी असेल. इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेत एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक प्रशिक्षक या नात्याने कार्यरत राहतील. राष्ट्रीय संघाचे मार्गदर्शक या नात्याने त्यांचा तीन वर्षांचा करार असून यंदा मोसम संपल्यानंतर ते भारतीय संघाचे पूर्णवेळ प्रशिक्षक बनतील. भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी त्यांनी क्रोएशियाच्या इगोर स्टिमॅक यांची जागा घेतली आहे.

‘‘स्पेननंतर भारत माझ्यासाठी देश आहे, जेथे मी सर्वाधिक काळ व्यतित केला आहे. भारतातील माझा हा पाचवा मोसम आहे. माझ्यावर विश्वास प्रदर्शित केल्याबद्दल मी ‘एआयएफएफ’प्रती आभारी आहे,’’ असे नवी दिल्ली येथे रविवारी पत्रकार परिषदेत मार्केझ यांनी नमूद केले.

‘‘एक दिवस राष्ट्रीय संघाचा प्रशिक्षक बनणे मला आवडेल असा विचार मी खूप पूर्वीपासून करत होतो आणि आता मी येथे आलो आहे. मी खूश आहे. भारताच्या राष्ट्रीय संघाचा प्रशिक्षक बनणे स्वप्नपूर्ती आहे,’’ असे मार्केझ पुढे म्हणाले. हैदराबाद संघात रुजू झाल्यानंतर पहिल्या सराव सत्रापासून माझे भारताशी नाते जोडले गेले, असेही त्यांनी नमूद केले.

मार्केझ यांचे भारतातील योगदान

२०२०-२१ मोसमात ते हैदराबाद एफसीचे प्रशिक्षक बनून भारतात आले, त्यानंतर २०२३-२४ मध्ये ते एफसी गोवाचे मुख्य प्रशिक्षक बनले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हैदराबाद एफसीने २०२१-२२ मध्ये आयएसएल करंडक पटकावला. गतमोसमात एफसी गोवाने आयएसएल साखळी फेरीत तिसरा क्रमांक मिळविताना करंडकाची उपांत्य फेरीही गाठली.

आशिया कप पात्रतेचे लक्ष्य

यावर्षी जूनमध्ये कतारमधील पराभवानंतर भारताचे २०२६ फिफा विश्वकरंडक पात्रता फेरीतील आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे नवे प्रशिक्षक मार्केझ यांचे पहिले लक्ष्य २०२७ एएफसी आशिया कप पात्रतेचे असेल. या स्पर्धेसाठी पात्रता फेरी मार्च २०२५ पासून सुरू होईल. एकूण २४ संघांची सहा गटात प्रत्येकी चार संघ अशी विभागणी असेल.

गटसाखळी विजेता संघ सौदी अरेबियात होणाऱ्या मुख्य फेरीसाठी पात्र ठरेल. या स्पर्धेचा ड्रॉ डिसेंबरमध्ये काढण्यात येईल. त्यामुळे आवश्यक मानांकन राखण्यासाठी सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबरमधील फिफा आंतरराष्ट्रीय सामन्यांचे टप्पे भारतासाठी महत्त्वाचे असतील. ‘‘मार्चमधील पहिल्या पात्रता लढतीपूर्वी आम्हाला सहा ते सात सामने खेळायला मिळतील. फिफाचा पहिला टप्पा आयएसएल सुरू होण्यापूर्वी आहे. डिसेंबरमधील आशिया कप ड्रॉसाठी आम्हाला पहिला गट आवश्यक असल्याचे विसरून चालणार नाही.

शेवटी हा तयारीचा भाग असून संघाच्या विकासात योग्य व्यक्तींची निवड महत्त्वाची आहे. आम्हाला असे खेळाडू हवेत जे वैयक्तिक पातळीवर नव्हे, तर संघासाठी खेळतील. केवळ अकरा नव्हे, तर संपूर्ण चमू २० ते २५ वयोगटातील हवा, त्यासाठी आम्हाला लायक खेळाडू शोधावे लागतील. प्रत्येकाला संघातील आपल्या जबाबदारीची जाणीव हवी आणि आम्हाला अपेक्षित असलेल्या शैलीत खेळावे लागेल,’’ असे मार्केझ यांनी आपल्या आगामी नियोजनाविषयी सांगितले.

आव्हान कठीण, तरीही आटोपशीर

एफसी गोवा आणि भारतीय संघाचे एकावेळी मार्गदर्शक जबाबदारी सांभाळण्याबाबत मार्केझ म्हणाले, की ‘‘ही परिस्थिती सामान्य नाही हे खरे असले, तरी आटोपशीर आहे. एकच व्यक्ती राष्ट्रीय संघ व क्लबचा एकत्र प्रशिक्षक असणे ही काही पहिली वेळ नाही. परदेशातच नाही, तर भारतातही अशी अनेक उदाहरणे आहेत.’’

दोन्ही पातळीवरील सामने जोडून नाहीत. जेव्हा राष्ट्रीय संघ खेळणार तेव्हा आयएसएल खंडित असेल, त्यामुळे समतोल साधता येईल. मात्र सुरवातीच्या काही आठवड्यांत कामाचा व्याप जास्त असेल, ही बाब त्यांनी स्पष्ट केली. ‘‘पण ही माझी आवड आहे, त्यामुळे अडचण येणार नाही याची खात्री आहे. अर्थात दोन्ही जबाबदाऱ्या व्यावसायिक आहेत. आम्ही राष्ट्रीय संघासाठी खूप मेहनत घेऊ, त्यामुळे शंका घेण्याचे कारण नाही,’’ असे म्हणाले.

राष्ट्रीय मार्गदर्शकासमोर भविष्यातील आव्हाने

सप्टेंबरमध्ये हैदराबाद येथे भारतासह सीरिया व मॉरिशसचा समावेश असलेली तीन देशांची इंटरकाँटिनेंटल कप स्पर्धा

ऑक्टोबरमध्ये पुन्हा तिरंगी स्पर्धा, भारतासह यजमान व्हिएतनाम व लेबनॉन संघांचा समावेश

मार्च २०२५ पासून आशिया कप पात्रता फेरी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Edberg Pereira Assault Video: पोलिसांनी लाथा घातल्या, मारहाण केली; परेरा मारहाणीचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर, पाहा व्हिडिओ

Edberg Pereira Assault Case: एडबर्ग परेरा मारहाण प्रकरणी निलंबित PSI निलेश वळवईकरांवर गुन्हा दाखल; पुढील तपास सुरु

Sleep Problem: झोपण्यापूर्वीच्या 'या' चुका तुम्हाला बनवत आहेत आजारी! वेळीच व्हा सावध

Poseidon Nuclear Drone: हिरोशिमा बॉम्बपेक्षा 6600 पट शक्तिशाली, पुतिन यांनी जगाला दाखवलं अणुशक्तीवर चालणाऱ्या ड्रोनचं विनाशकारी रुप; अमेरिका-नाटो चिंतेत VIDEO

Watch Video: हाय सायबा!! डोक्यावर धो-धो पाऊस तरीही पालिका इमारतीच्या छतावर चढला कामगार; म्हापशातला गजब प्रकार Viral

SCROLL FOR NEXT