Shubman Gill Double Century Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Shubman Gill Double Century: कर्णधार शुभमन गिलचा डबल धमाका, इंग्लंडविरुद्ध झळकावले 'द्विशतक'

IND vs ENG: टीम इंडियाचा नवा कर्णधार शुभमन गिलने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात द्विशतक झळकावले.

Manish Jadhav

Shubman Gill Double Century: टीम इंडियाचा नवा कर्णधार शुभमन गिलने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील दुसऱ्या सामन्यात द्विशतक झळकावले. गिलने बर्मिंगहॅमच्या मैदानावर 311 चेंडूत आपले द्विशतक पूर्ण केले. गिलचे हे कसोटीतील पहिले द्विशतक आहे. त्याने 21 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने हे शानदार द्विशतक पूर्ण केले. या मालिकेपूर्वी गिलला टीम इंडियाचा कर्णधार बनवण्यात आले. त्याने पहिल्या सामन्यातही शतक झळकावले.

इंग्लंडमध्ये द्विशतक झळकावणारा पहिला आशियाई कर्णधार

दरम्यान, गिल हा इंग्लंडच्या भूमीवर द्विशतक झळकावणारा पहिला भारतीय कर्णधार बनला. आतापर्यंत कोणत्याही आशियाई कर्णधाराला इंग्लंडमध्ये कसोटीत द्विशतक झळकावता आलेले नाही. याआधी इंग्लंडमध्ये सर्वात मोठी खेळी करणारा भारतीय कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन होता. त्याने 1990 मध्ये मँचेस्टर कसोटीत 179 धावा केल्या होत्या. आशियाई कर्णधाराचा विक्रम श्रीलंकेच्या तिलकरत्ने दिलशानच्या नावावर होता. त्याने 2011 मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर 193 धावांची खेळी खेळली होती.

द्रविड आणि गावस्कर यांनी इंग्लंडमध्ये द्विशतके ठोकली

शुभमन गिलच्या आधी केवळ दोन भारतीय खेळाडूंनी इंग्लंडमध्ये द्विशतके केली होती. सुनील गावस्कर यांनी 1979 मध्ये 221 धावांची खेळी खेळली होती. राहुल द्रविडने 2002 मध्ये ओव्हल मैदानावर 217 धावा केल्या होत्या. आता गिल या यादीत समाविष्ट होणारा तिसरा फलंदाज बनला. तसेच, 2002 मध्ये सचिन तेंडुलकरनेही इंग्लंडमध्ये 193 धावांची तूफानी खेळी खेळली होती.

कोहलीचा 7 वर्षे जुना रेकॉर्ड मोडला

गिलने 150 धावांचा टप्पा गाठताच त्याने कोहलीचा रेकॉर्डही मोडला. एजबॅस्टन येथे भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्ड आता गिलच्या नावावर आहे. यापूर्वी, हा रेकॉर्ड कोहलीच्या नावावर होता, ज्याने 2018 च्या कसोटीत 149 धावा केल्या होत्या. गिलच्या आधी या मैदानावर शतक करणारा कोहली एकमेव भारतीय कर्णधार होता. त्याचवेळी, या मैदानावर भारतीय फलंदाजाने सर्वाधिक धावा करण्याचा रेकॉर्डही आता गिलच्या नावावर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa News Live: ओपा जल शुद्धीकरण प्रकल्पाजवळ ट्रक दरीत कोसळला

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

Goa Rain Update: गोव्यात जिकडे तिकडे पाणीच पाणी! पावसाचा रौद्रावतार; आपत्कालीन यंत्रणा सतर्क

SCROLL FOR NEXT