Ind Vs SA 1st ODI Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Ind Vs SA ODI: KL राहुल की पंत, वॉशिंग्टन की नितीशकुमार? कोण खेळणार? रोहित, विराटच्या कामगिरीवर लक्ष

Ind Vs SA 1st ODI: कसोटी मालिकेतील मानहानिकारक हार मागे टाकून भारतीय संघ आता व्हाईटबॉल प्रकारात आपले अस्तित्व सिद्ध करण्यास सज्ज होत आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

रांची: कसोटी मालिकेतील मानहानिकारक हार मागे टाकून भारतीय संघ आता व्हाईटबॉल प्रकारात आपले अस्तित्व सिद्ध करण्यास सज्ज होत आहे. या वेळी महान फलंदाज रोहित शर्मा आणि विराट कोहली त्यांच्या साथीला असणार आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना उद्या होत आहे.

प्रकार कोणताही असला तरी क्रिकेटच्या रुळावरची भारताची गाडी घसरली आहे. उद्यापासून सुरू होणारी मालिका एकदिवसीय प्रकाराची असली तरी त्यानंतर होणारी टी-२० मालिका टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची आहे.

त्यासाठी प्रामुख्याने फलंदाजांना सूर सापडणे आवश्यक आहे. फलंदाजांच्या अपयशामुळेच आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीत पराभवाची नामुष्की ओढवली होती. दुसरीकडे रोहित शर्मा आणि विराट कोहली केंद्रस्थानी असले आणि त्यांच्यासाठी प्रेक्षकांचीही गर्दी होणार असली तरी या दोघांसाठीही प्रत्येक सामना सिद्ध करत राहण्यासारखा आहे.

हे दोघेही एकदिवसीय प्रकारातच खेळत आहे आणि या प्रकारातील सामने ठरावीक अंतराने होत आहेत. दोन महिन्यांच्या कालावधीत भारतीय संघ आता आफ्रिकेविरुद्ध तीन आणि नंतर न्यूझीलंडविरुद्ध तीन असे सहाच सामने खेळणार आहे.

ऑस्ट्रेलियातील दौऱ्यातील एकदिवसीय मालिका गमावली असली तरी रोहित शर्माने शतक केले आणि विराटनेही अर्धशतकी खेळी केली. या दोघांच्या निर्णायक भागीदारीमुळे भारताचा विजय झाला होता. तरीही २०२७ मधील विश्वकरंडक खेळायचे असेल तर या दोघांना प्रत्येक सामन्यांत निर्णायक योगदान देऊन आपली उपयुक्तता दाखवून द्यावी लागणार आहे.

रांचीच्या याच मैदानावर २०१३ मध्ये रोहित शर्मा प्रथमच पूर्ण वेळ सलामीवीर म्हणून मैदानात उतरला होता. त्यानंतर ५० षटकांच्या या प्रकारात तो बादशहा झाला. तीन द्विशतके आणि सर्वाधिक २६४ धावांची खेळी त्याने आपल्या कारकिर्दीत केलेली आहे. तरीही आता त्याला सातत्य दाखवावे लागणार आहे.

एकीकडे रोहित आणि विराट यांनी आपले अस्तित्व सिद्ध करावे लागणार असताना दुसरीकडे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांचेही स्थान डळमळीत आहे. टी-२० विश्वकरंडक स्पर्धा तोंडावर आलेली असताना त्यांना लगेचच दूर केले जाणार नाही; परंतु २०२७च्या विश्वकरंडक स्पर्धेपर्यंत संघासोबत रहाण्यासाठी त्यांच्यासाठी बहुतांशी निकाल सकारात्मक लागणे महत्त्वाचे आहे.

खेळाडूंच्या खराब कामगिरीमुळे कसोटी मालिकेत संघाची पिछेहाट झाली, असे सांगण्यात येत असले तरी गंभीर यांनी संघनिवडीत सातत्याने केलेले बदल आणि काही तांत्रिक चुका मुळावर आल्या होत्या. या एकदिवसीय मालिकेत मुळात व्यवस्थित संघ निवड करावी लागणार आहे.

शुभमन गिल, श्रेयस अय्यर यांची दुखापतीमुळे अनुपस्थिती आणि जसप्रीत बुमरा आणि मोहम्मद सिराज यांना देण्यात आलेली विश्रांती यामुळे अंतिम ११ खेळाडू निवडताना सावधगिरी बाळगावी लागणार आहे.

रोहित शर्मा-यशस्वी जयस्वाल ही सलामीची जोडी असेल. त्यानंतर विराट कोहली, तिलक वर्मा आणि कर्णधार केएल राहुल अशी फलंदाजीची क्रमवारी असेल. राहुल यष्टीरक्षण करणार असल्यामुळे रिषभ पंतला जागा मिळण्याची शक्यता कमीच आहे. रवींद्र जडेजा अष्टपैलू म्हणून संघात असताना दुसरा अष्टपैलू म्हणून वॉशिंग्टन सुंदर की नितीशकुमार रेड्डी यापैकी कोणाला संधी दिली जाते, याकडेही लक्ष असेल.

भारताची वेगवान गोलंदाजी अनुभवात कमी आहे. त्यातल्या त्यात अर्शदीप भरवशाचा आहे; परंतु हर्षित राणा आणि प्रसिध कृष्णा यांना अधिक अचूकता दाखवावी लागणार आहे.

भारत ः केएल राहुल (कर्णधार), रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, तिलक वर्मा, रिषभ पंत, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, नितीशकुमार रेड्डी, हर्षित राणा, ऋतुराज गायकवाड, प्रसिध कृष्णा, अर्शदीप सिंग, ध्रुव जुरेल.

दक्षिण आफ्रिका ः तेंबा बवुमा (कर्णधार), एडन मार्करम, डेवाल्ड ब्रेविस, नांद्र बर्गर, क्विंटॉन डिकॉक, मार्को यान्सेन, टॉनी डी झॉर्जी, रुबिन हार्ममन, ऑटनिल बार्टमन, काब्रिन बॉश, मॅथ्यू ब्रीत्झे, केवशव महाराज, लुंगी एन्गिडी, रायन रिकल्टन.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Luthra Brothers: लुथरा बंधूंची पोलिस कोठडी संपुष्टात! कोर्टात करणार हजर; चौकशी समितीच्या अहवाल होणार सादर

Goa ZP Election: जिल्‍हा पंचायती भाजपकडे की विरोधक मारणार बाजी? जनतेचा कल होणार स्पष्ट; मंत्री, आमदारांच्‍या भवितव्‍याचाही फैसला

Horoscope: नव्या सप्ताहाची दमदार सुरुवात! 'या' राशींना मिळणार करिअरमध्ये मोठी संधी, वाचा भविष्य

Goa Crime: कौटुंबिक वादातून चुलत भावाचा प्राणघातक हल्ला, 23 वर्षीय तरुण गंभीर जखमी; काणकोणातील धक्कादायक घटनेने खळबळ

Labh Drishti Yog 2026: शुक्र-शनीचा 'लाभ दृष्टी योग'! 15 जानेवारीपासून पालटणार 'या' 5 राशींचे नशीब; धनलाभासह करिअरमध्ये प्रगतीचे संकेत

SCROLL FOR NEXT