FC GOA  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

FC GOA साठी आनंदाची बातमी! 'हे' दोन खेळाडू तंदुरुस्त; पुढचा सामना मुंबई सिटीविरुद्ध

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: एफसी गोवाच्या आघाडीफळीतील प्रमुख खेळाडू इकेर ग्वॉर्रोचेना, भारताचा आंतरराष्ट्रीय बचावपटू संदेश झिंगन दुखापतीमुळे इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील चारही सामने खेळू शकले नव्हते, त्यामुळे मुख्य प्रशिक्षक मानोलो मार्केझही चिंतित होते. आता दोघेही अनुभवी खेळाडू तंदुरुस्तीच्या दिशेने वाटचाल करत असून त्यामुळे संघालाही दिलासा मिळाला.

एफसी गोवा आणि गोवा पोलिस संघातील मैत्रीपूर्ण सामना बांबोळी येथील ॲथलेटिक स्टेडियमवर झाला. अपेक्षेनुसार एफसी गोवाने सामना ९-० अशा दणदणीत फरकाने जिंकला. आयएसएल स्पर्धेत चार गोल केलेला अल्बानियाचा आर्मांदो सादिकू याने हॅटट्रिक साधली. या लढतीत ग्वॉर्रोचेना व झिंगन दोघेही खेळले आणि त्यांनी मैदानावरील सुमारे तासाभराच्या उपस्थितीत छाप पाडली.

एफसी गोवाचा पुढील आयएसएल सामना १९ ऑक्टोबर रोजी फातोर्ड्यात मुंबई सिटीविरुद्ध होणार आहे. त्या लढतीत ग्वॉर्रोचेना व झिंगन खेळण्याची शक्यता बळावली आहे. स्पॅनिश खेळाडूने गोवा पोलिस संघाविरुद्ध तीन संधी निर्माण करताना एक गोलही नोंदविला. याव्यतिरिक्त ब्रायसन फर्नांडिस, उदांता सिंग, मुहम्मद नेमिल, बोर्हा हेर्रेरा व आयुष छेत्री यांनीही प्रत्येकी एक गोल केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhas Velingkar Controversy: गोमंतकीयांना 'शांतता' हवी! ‘गोंयकार’पण म्हणजे काय, हे समजून घेणे अतिशय गरजेचे

Rent Bike In Goa: आम्हालाही ‘रेंट बाईक’चा परवाना द्या! खासगी दुचाकीधारकांची मागणी

Maryam Nawaz: ''प्लीज मदत करा...''; जयशंकर यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वी मरियम नवाझ यांची भारताला हाक!

Vinoo Mankad Trophy: गोव्याचा 'विनू मांकड स्पर्धे'तील मोहिमेचा विजयाने समारोप; चंडीगढवर ४० धावांनी मात

Stray Dogs Attack: दुर्दैवी! भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यातील जखमी चोडणकरांचा उपचारादरम्यान मृत्यू!

SCROLL FOR NEXT