RCB Women Players Goa Trip Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

"रिफ्रेश आणि रिचार्ज!" फायनलपूर्वी RCBच्या पोरींची गोव्यात धम्माल; स्मृती अन् सायलीचा कूल अंदाज तर श्रेयंका-अरुंधतीचा स्टायलिश लूक चर्चेत

RCB Women in Goa: वुमन्स प्रीमियर लीग 2026 च्या फायनलपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या (RCB) पोरींनी गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर धमाल केली.

Manish Jadhav

RCB Women Players Goa Trip: वडोदरा येथे 5 फेब्रुवारी रोजी म्हणजेच आज होणाऱ्या वुमन्स प्रीमियर लीग 2026 च्या फायनलपूर्वी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या (RCB) पोरींनी गोव्याच्या समुद्रकिनारी धम्माल केली. आरसीबीची कर्णधार स्मृती मंधाना, युवा फिरकीपटू श्रेयंका पाटील आणि वेगवान गोलंदाज अरुंधती रेड्डी व सायली सातघरे या चौघींनी फायनलच्या मोठ्या दबावापूर्वी स्वतःला 'रिचार्ज' करण्यासाठी गोव्याची निवड केली. साखळी फेरीत आठपैकी सहा सामने जिंकून 29 जानेवारीलाच फायनलमधील आपले स्थान पक्के केल्याने या खेळाडूंना हा छोटासा पण महत्त्वाचा विसावा मिळाला.

गोव्याच्या (Goa) सुंदर समुद्रकिनाऱ्यावर या चौघींनी आपल्या लाल-काळ्या जर्सी बाजूला ठेवून स्टायलिश आणि 'कॅज्युअल' पेहरावात फोटोसेशन केले. श्रेयंका पाटीलने या ट्रीपचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर करताना लिहिले की, "फायनल सामन्यापूर्वी पूर्णपणे ताजेतवाने होण्यासाठी ही एक सुवर्णसंधी होती."

स्मृती मंधाना यावेळी पूर्णपणे ब्लॅक लूक मध्ये दिसली. तिने क्रॉप टॉप आणि रिलॅक्स-फिट बॉटम्ससोबत एक गडद हिरव्या रंगाचे मखमली जॅकेट परिधान केले होते, जे तिच्या लूकला एक वेगळीच झळाळी देत होते. तर श्रेयंकाने समुद्रकिनाऱ्याला साजेसा निळ्या रंगाचा फ्लोरल मिडी ड्रेस घातला होता, ज्यामध्ये ती अत्यंत सुंदर दिसत होती.

अरुंधती रेड्डीने आपल्या कूल स्वभावाला साजेसा हिरव्या रंगाचा स्वेटशर्ट आणि ब्लॅक पँट असा पेहराव केला होता. तर सायली सातघरे व्हाईट टँक टॉप आणि मॉम जीन्समध्ये स्टायलिश दिसत होती. वडोदऱ्याच्या बीसीए स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध होणाऱ्या अटीतटीच्या सामन्यापूर्वी या खेळाडूंनी मानसिक शांततेसाठी घेतलेला हा ब्रेक त्यांच्या कामगिरीवर सकारात्मक परिणाम करु शकतो. साखळी फेरीत मंधानाने डब्ल्यूपीएलच्या इतिहासात पहिले शतक ठोकण्याचा विक्रमही आपल्या नावावर केला आहे. आता हा गोव्याचा 'रिफ्रेशिंग' ब्रेक आरसीबीला त्यांचे दुसरे विजेतेपद मिळवून देण्यात किती मदत करतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: पिकलेल्या भातशेतीसमोर मोठे संकट, हार्वेस्टिंग मशीनची प्रतीक्षा; मांद्रे-कोरगाव हद्दीतील पीक वाया जाण्‍याची भीती

Asian Games 2026: गोल्डन गर्लज्! रोमहर्षक लढतीत भारताच्या पोरींनी मारली बाजी; इराणची धूळधाण करत पटकावलं 'सुवर्णपदक' VIDEO

Stray Cattle: होंडा-वाळपई मार्गावर भटक्या गुरांचा सुळसुळाट, रात्रीच्‍या वेळी रस्त्यावर ठाण; अपघातांना आमंत्रण, दुचाकीस्‍वारांना धोका

Patto Bridge Security: पाटो पुलावरील सुरक्षेच्या त्रुटींवर 'मानवाधिकार'ची तंबी; सीसीटीव्ही, पथदिवे आणि 24 तास पोलिस गस्तीचे निर्देश

Viral Video: 'पोरांचं काय चाललंय?' एकाच बाईकवर सहा शाळकरी मुलांचा थरारक प्रवास; व्हिडिओ समोर येताच पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT