पणजी: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेप्रमाणे २३ वर्षांखालील कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट स्पर्धाही २०२५-२६ मोसमात दोन टप्प्यात होणार आहे. एलिट अ गटातील गोव्याची मोहीम १६ ऑक्टोबरपासून सुरू होईल.
कर्नल सी. के. नायडू करंडक क्रिकेट स्पर्धेचा पहिला टप्पा ५ नोव्हेंबर रोजी संपेल, नंतर २३ जानेवारीपासून दुसऱ्या टप्प्यातील लढती होतील. एलिट गटात पहिल्या टप्प्यात तीन, तर दुसऱ्या टप्प्यात चार लढती नियोजित आहेत. २३ वर्षांखालील वयोगटातील स्टेट ए (एकदिवसीय) करंडक स्पर्धेला चार दिवसीय सामन्यांची स्पर्धा खंडित झाल्यानंतर ९ नोव्हेंबरपासून सुरवात होईल.
कर्नल सी. के. नायडू करंडक स्पर्धेत एलिट ए गटात झारखंड, गुजरात, मेघालय, बडोदा, पंजाब, केरळ व जम्मू-काश्मीर हे संघ गोव्याचे प्रतिस्पर्धी आहेत. सातपैकी तीन सामने गोव्याचा संघ घरच्या (होम) मैदानावर खेळेल. एकदिवसीय स्पर्धेत एलिट ब गटात ओडिशा, आसाम, गुजरात, झारखंड, आंध्र, जम्मू-काश्मीर, मुंबई हे संघ गोव्याचे प्रतिस्पर्धी आहेत.
या गटातील सर्व लढती ९ ते २१ नोव्हेंबर या कालावधीत बडोदा येथे खेळल्या जातील. गतमोसमात गोव्याची दोन्ही गटातील कामगिरी अपेक्षित नव्हती, दोन्ही स्पर्धांत प्रत्येकी एका विजयाची नोंद केली होती.
नियोजित वेळापत्रक: २३ वर्षांखालील कर्नल सी. के. नायडू करंडक, एलिट अ ः विरुद्ध झारखंड - १६ ते १९ ऑक्टोबर (अवे), विरुद्ध गुजरात - २६ ते २९ ऑक्टोबर (होम), विरुद्ध मेघालय - २ ते ५ नोव्हेंबर (अवे), विरुद्ध बडोदा - २३ ते २६ जानेवारी (होम), विरुद्ध पंजाब - ३० जानेवारी ते २ फेब्रुवारी (होम), विरुद्ध केरळ - ६ ते ९ फेब्रुवारी (अवे), विरुद्ध जम्मू-काश्मीर - १३ ते १६ फेब्रुवारी (अवे).
२३ वर्षांखालील लिस्ट ए करंडक, एलिट ब (स्थळ - बडोदा): विरुद्ध ओडिशा - ९ नोव्हेंबर, विरुद्ध आसाम - ११ नोव्हेंबर, विरुद्ध गुजरात - १३ नोव्हेंबर, विरुद्ध झारखंड - १५ नोव्हेंबर, विरुद्ध आंध्र - १७ नोव्हेंबर, विरुद्ध जम्मू-काश्मीर - १९ नोव्हेंबर, विरुद्ध मुंबई - २१ नोव्हेंबर.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.