Snehal Kauthankar Double Century: रणजी करंडक क्रिकेट प्लेट स्पर्धेत गोवा आणि नागालॅंड यांच्यात घमासान पाहायला मिळत आहे. चौथ्या दिवशी गोव्याच्या फलंदाजांनी नागालॅंडच्या गोलंदाजांचा चांगलाचं समाचार घेतला. स्नेहल कवठणकर आणि कश्यप बखले यांनी शानदार फलंदाजी केली. गोव्याचे धाकड नागालॅंडच्या गोलंदाजांवर तुटून पडले. स्नेहलने नाबाद द्विशतक (202) ठोकले तर कश्यप बखलेने 161 धावांची शानदार खेळी खेळली. या दोघांच्या अफलातून खेळीच्या जोरावरच गोव्याने धावांचा डोंगर उभारला.
गोव्याने (Goa) 578 धावांचे लक्ष्य ठेवून 7 बाद 517 धावांवर आपला डाव घोषित केला. स्नेहल आणि कश्यपने आपल्या शानदार खेळीदरम्यान चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडला. दोघांनीही चौफेर फटकेबाजी केली. पहिल्या दिवशी नागालॅंडच्या गोलंदाजांनी गोव्याला घायगुतीला आणले होते. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी गोव्याच्या गोलंदाज आणि फलंदाजांनी सामन्यात पुन्हा कमबॅक करत नागालॅंडला कडवी टक्कर दिली. दरम्यान, स्नेहल आणि कश्यप यांच्या अभेद्य भागीदारीमुळे गोव्याने रणजी करंडक क्रिकेट प्लेट विजेतेपदासाठीचा दावा भक्कम केला. दुसरीकडे, चौथ्या दिवसाअखेर खेळण्यासाठी आलेल्या नागालॅंडच्या संघाने विकेट न गमावता 33 धावा केल्या, तरीही त्यांना विजयासाठी 545 धावांची आवश्यकता आहे.
पाच दिवसीय अंतिम सामना नागालँडमधील सोविमा येथे सुरु आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवसाअखेर गोव्याने दुसऱ्या डावात 3 बाद 224 धावा केल्या होत्या. कश्यपने रणजी सामन्यात लागोपाठ दुसऱ्यांदा शतक नोंदवले. शनिवारी (22 जानेवारी) सामन्याच्या तिसऱ्या दिवशी सकाळी 4.5 षटकांत आणखी 11 धावांची भर टाकून नागालँडचा पहिला डाव 216 धावांत संपुष्टात आला होता. त्यामुळे गोव्याला 60 धावांची आघाडी मिळाली होती. मध्यमगती गोलंदाज हेरंब परब याने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी नोंदविताना 30 धावांत 5 विकेट्स घेतल्या.
मागील नोव्हेंबरमध्ये पर्वरी येथे अरुणाचल प्रदेशविरुद्ध रणजी प्लेट सामन्यात स्नेहल कवठणकर (नाबाद 314) व कश्यप बखले (नाबाद 300) यांनी तिसऱ्या विकेटसाठी 606 धावांची विक्रमी अभेद्य भागीदारी केली होती. तोच फॉर्म कायम राखताना शनिवारी ही जोडी गोव्यासाठी संकटमोचक ठरली होती.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.