Darshan Misal  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Ranji Trophy 2024: गोव्याच्या 83 धावांनी दणदणीत विजय! फिरकी गोलंदाजांची कमाल; नागालँडचा पहिलाच पराभव

Goa Ranji Team: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत पदार्पण करणारा ऑफस्पिनर राहुल मेहता (४-४८) याने योग्य टप्पा राखत नागालँडच्या प्रमुख फलंदाजांना गळाला लावल्यानंतर कर्णधार दर्शन मिसाळने (५-५१) प्रभावी डावखुऱ्या फिरकीच्या बळावर प्रतिस्पर्ध्यांची नांगी ठेचली.

गोमन्तक डिजिटल टीम

Ranji Trophy 2024 Goa Vs Nagaland

पणजी: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत पदार्पण करणारा ऑफस्पिनर राहुल मेहता (४-४८) याने योग्य टप्पा राखत नागालँडच्या प्रमुख फलंदाजांना गळाला लावल्यानंतर कर्णधार दर्शन मिसाळने (५-५१) प्रभावी डावखुऱ्या फिरकीच्या बळावर प्रतिस्पर्ध्यांची नांगी ठेचली. त्यामुळे प्लेट विभाग स्पर्धेत गोव्याने मंगळवारी ८३ धावांनी दणदणीत विजय मिळविला.

गोव्याने सलग तिसरा सामना जिंकत २०२५-२६ मोसमासाठी एलिट विभागासाठी पात्रता जवळपास निश्चित केली आहे. त्यांचे आता गटात सर्वाधिक १९ गुण झाले असून पुढील सामना ६ नोव्हेंबरपासून अहमदाबाद येथे मिझोरामविरुद्ध होईल, त्यानंतर अखेरचा साखळी सामना १३ नोव्हेंबरपासून पर्वरी येथे अरुणाचल प्रदेशविरुद्ध खेळला जाईल. नागालँडचा हा पहिला पराभव असून तीन लढतीनंतर त्यांचे १३ गुण कायम राहिले. मिझोरामचेही १३ गुण असून सिक्कीमच्या खाती १२ गुण आहेत. मणिपूर व अरुणाचल प्रदेशने तिन्ही सामने गमावले आहेत.

कांपाल येथील पणजी जिमखान्याच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानावर सामन्याच्या चौथ्या दिवशी नागालँडने ८० धावांत नऊ विकेट गमावल्या. त्यामुळे ३३९ धावांच्या आव्हानासमोर त्यांचा डाव अखेरच्या दिवशी सुमारे पाऊण तासाचा खेळ बाकी असताना २५५ धावांत संपुष्टात आला. सोमवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसाने मैदान प्रभावित झाल्यामुळे मंगळवारी दुपारी उपाहारानंतर दीड वाजता खेळास सुरवात झाली. यावेळी पाहुण्या संघाची १ बाद १४५ अशी मजबूत स्थिती होती, तर यजमान संघ बॅकफूटवर होता.

शतकापासून सहा धावा दूर असताना डी. निश्चल याला राहुल मेहताने अप्रतिम चेंडूवर स्वतःच झेलबाद केल्यानंतर नागालँडच्या घसरगुंडीस सुरवात झाली. निश्चलने १९९ चेंडूंत नऊ चौकारांसह ९४ धावा केल्या. हेम छेत्री (२५) याला त्रिफळाचीत बाद केल्यानंतर राहुलने धोकादायक राँगसेन जोनाथन (०) याला समर दुभाषीकरवी यष्टिचीत बाद करून गोव्याच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. नागालँडने पाच विकेट फक्त २१ धावांत गमावल्या. नंतर चेतन बिस्त (४१) व जे. सुचित (२३) यांनी सामना अनिर्णितावस्थेकडे झुकविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दर्शनने एका धावेच्या अंतराने चेतन (पायचीत) व सुचित (यष्टीमागे झेलबाद) यांना बाद केल्यानंतर गोव्याला विजय हुकणार नाही, हे निश्चित झाले.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव १७९ व दुसरा डाव ३०६.

नागालँड, पहिला डाव १४७ व दुसरा डाव (१ बाद १४५ वरून) १०४. १ षटकांत सर्वबाद २५५ (डी. निश्चल ९४, हेम छेत्री २५, चेतन बिस्त ४१, जे. सुचित २३, अर्जुन तेंडुलकर १७-२-५२-०, शुभम तारी १४-४-२३-१, दर्शन मिसाळ ३०.१-१५-५१-५, मोहित रेडकर २४-१-६८-०, राहुल मेहता १९-२-४८-४).

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT