Agni Chopra Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Agni Chopra: ‘रन मशिन’ अग्नी चोप्राचा झंझावात रोखण्याचं गोव्यासमोर आव्हान; गोलंदाजांची लागणार कसोटी

Ranji Trophy 2024: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या प्लेट विभागात मिझोरामचा डावखुरा फलंदाज अग्नी चोप्रा ‘रन मशिन’ ठरला आहे.

Manish Jadhav

पणजी: रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या प्लेट विभागात मिझोरामचा डावखुरा फलंदाज अग्नी चोप्रा ‘रन मशिन’ ठरला आहे. तीन सामन्यांतील पाच डावांत 25 वर्षीय फलंदाजाने 161.50 च्या सरासरीने 646 धावांचा रतीब टाकला असून पुढील लढतीत गोव्याच्या गोलंदाजांसमोर या फॉर्ममधील फलंदाजास रोखण्याचे आव्हान असेल.

गोवा आणि मिझोराम यांच्यातील चार दिवसीय प्लेट विभाग सामना बुधवारपासून (ता. 6) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या ‘ब’ मैदानावर खेळला जाईल. गोवा सध्या 19 गुणांसह अग्रस्थानी असून मिझोराम 13 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहे.

अग्नी चोप्राचा झंझावात

हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक विधू विनोद चोप्रा यांचा अग्नी हा मुलगा आहे. मुंबईत क्रिकेटचे धडे गिरवलेला हा डावखुरा फलंदाज 2023-24 मोसमापासून रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मिझोरामचे प्रतिनिधित्व करत आहे. सिक्कीमविरुद्ध पदार्पणात शतक ठोकल्यानंतर त्याने नऊ प्रथम श्रेणी सामन्यांतील 17 डावांत 99.06च्या सरासरीने 1585 धावा केल्या आहेत. यामध्ये आठ शतके व चार अर्धशतकांचा समावेश आहे.

शतकी दणका

यंदाच्या रणजी स्पर्धेच्या प्लेट विभागात अग्नी याने रंगपो येथे सिक्कीमविरुद्ध अनुक्रमे 51 व 29 धावा, अहमदाबाद येथे अरुणाचल प्रदेशविरुद्ध 110 व नाबाद 238 धावा, तर नादियाड येथे मागील लढतीत मणिपूरविरुद्ध 218 धावा केल्या. यंदा लागोपाठ दोन द्विशतके करुन त्याने लक्ष वेधले आहे.

गतमोसमात त्याने रणजी पदार्पणासह सलग चार सामन्यांत ठोकून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये विक्रम नोंदवला होता. आक्रमक शैलीत फलंदाजी करणाऱ्या अग्नी याच्या बॅटला गोव्याच्या गोलंदाजांनी लगाम घातल्यास मिझोरामचा डाव कोसळेल हे स्पष्टच आहे. अरुणाचल आणि मणिपूरविरुद्धच्या विजयात मिझोरामसाठी अग्नीचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले आहे. गोव्यासाठी पुढील लढतीत तोच मुख्यतः अडसर असेल.

गोव्यातर्फे गोलंदाजीत दर्शनचे सातत्य

प्लेट विभागातील संघांवर मागील तीन लढतीत प्रतिस्पर्ध्यांवर निर्विवाद वर्चस्व राखण्यास गोव्याच्या गोलंदाजांना यश आलेले नाही. 17 गडी बाद केलेला कर्णधार दर्शन मिसाळ याची डावखुरी फिरकी वगळता, इतर गोलंदाजांना अपेक्षित सातत्य राखता आलेले नाही. नागालँडविरुद्ध मागील लढतीत पदार्पण करताना दोन्ही डावांत मिळून ऑफस्पिनर राहुल मेहता याने सहा गडी बाद केले ही गोव्यासाठी जमेची बाजू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Amazon Investment In India: भारतात 35 अब्ज डॉलर गुंतवणूक, अमेझॉनची घोषणा; देशात 10 लाख नोकऱ्या निर्माण होणार

Goa Tourism: युरोप-आशियातून थेट गोवा! रशिया-कझाकस्तानमधून 2 नवीन विमानसेवा सुरु

Goa Politics: खरी कुजबुज; 'नरकासुराच्‍या साक्षीने केलेली युती?'

Valpoi: वाळपईत वाहतुकीची कोंडी, रस्त्यालगतची कामे ठरतायेत डोकेदुखी; वाहनांच्या लागतात रांगा

Goa Nightclub Fire: 'पळपुटे' लुथरा बंधू सापडले! फुकेटमधून घेतलं ताब्यात, पासपोर्ट निलंबित; गोवा पोलिसांचे मिशन Successful

SCROLL FOR NEXT