Snehal Kavthankar  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Ranji Trophy 2024: गोव्याच्या फलंदाजांची आतिषबाजी! 'स्नेहल'चे दुसरे द्विशतक; मिझोराम संकटात

Ranji Cricket Trophy 2024: सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर गोव्याच्या गोलंदाजांनी मिझोरामची ६ बाद १२२ अशी स्थिती करून विजयाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले. गोव्याचा संघ अजून ४३३ धावांनी पुढे असून प्रतिस्पर्ध्यांवर फॉलोऑन लादण्याची नामी संधी आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Ranji Cricket Trophy 2024 Goa Vs Mizoram

पणजी: स्नेहल कवठणकरने कारकिर्दीतील दुसरे द्विशतक नोंदविताना रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत अडीचशे धावा करणारा तिसरा गोमंतकीय फलंदाज बनण्याचा मान मिळविला. त्या आधारे प्लेट विभाग क्रिकेट सामन्यात त्याच्या संघाने दुबळ्या मिझोरामविरुद्ध ९ बाद ५५५ धावांचा पर्वत रचला.

गोव्याने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियमच्या ‘ब’ मैदानावर स्पर्धेतील आपली सहाव्या क्रमांकाची सर्वोच्च धावसंख्या उभारली.

सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर गोव्याच्या गोलंदाजांनी मिझोरामची ६ बाद १२२ अशी स्थिती करून विजयाच्या दिशेने भक्कम पाऊल टाकले. गोव्याचा संघ अजून ४३३ धावांनी पुढे असून प्रतिस्पर्ध्यांवर फॉलोऑन लादण्याची नामी संधी आहे.

गोव्याविरुद्धच्या लढतीपूर्वी तीन सामन्यांतील पाच डावांत १६१.५०च्या सरासरीने ६४६ धावा केलेल्या अग्नी चोप्रा याला एका धावेवर पायचीत करून मोहित रेडकरने मिझोरामला जबर धक्का दिला. फक्त सात धावांत चार विकेट गमावल्यामुळे मिझोरामचा डाव ४ बाद ३५ असा गडगडला होता. नंतर जेहू अँडरसन (नाबाद ४५) याने मोहित जांग्रा (२५) व विकास कुमार (१९) यांच्यासमवेत खिंड लढविल्यामुळे त्यांना दुसऱ्या दिवसअखेर गुरुवारी सव्वाशे धावांच्या जवळ पोहचता आले.

फलंदाजी बहरली

सामन्याच्या पहिल्या दिवसअखेर स्नेहल १३५ धावांवर खेळत होता, गुरुवारी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीही २९ वर्षीय क्रिकेटपटूची फलंदाजी बहरली. आत्मविश्वासाने खेळत द्विशतकी धावसंख्या उभारताना त्याने प्रेक्षणीय २५० धावा केल्या. त्याने ३४२ चेंडूंतील खेळीत २५ चौकार मारले. सकाळच्या सत्रात दीपराज गावकर (५५) लगेच बाद झाल्यामुळे चौथ्या विकेटची भागीदारी १३३ धावांत संपली. नंतर स्नेहलने कर्णधार दर्शन मिसाळ (२५) याच्यासमवेत ५३ धावांची, समर दुभाषी (१७) याच्यासह ५० धावांची, तर राहुल मेहता (४८) याच्यासह ७६ धावांची भागीदारी करून संघाला साडेपाचशे धावांपर्यंत नेले. स्नेहलचे कारकिर्दीतील वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या नोंदविताना ५४व्या लढतीत आठव्यांदा शतकी खेळी केली आहे.

डावात अडीचशे धावा करणारे गोमंतकीय

नाबाद ३०४ ः सगुण कामत विरुद्ध सेनादल, कटक येथे २०१६-१७

नाबाद २५४ ः स्वप्नील अस्नोडकर विरुद्ध रेल्वे, मडगाव येथे २००७-०८

२५० ः स्नेहल कवठणकर विरुद्ध मिझोराम, अहमदाबाद येथे २०२४-२५

एकपेक्षा जास्त द्विशतक नोंदवणारे गोव्याचे खेळाडू

स्वप्नील अस्नोडकर ः ३ - २०४ विरुद्ध त्रिपुरा (मडगाव, २००५-०६), नाबाद २५४ विरुद्ध रेल्वे (मडगाव, २००७-०८), २३२ विरुद्ध जम्मू-काश्मीर (जम्मू, २०१५-१६)

स्नेहल कवठणकर ः २ - २२५ विरुद्ध हरियाना (गाझियाबाद, २०१६-१७), २५० विरुद्ध मिझोराम (अहमदाबाद, २०२४-२५)

- संकलन ः किशोर पेटकर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'पोगो'वरुन गदारोळ, युरी आलेमावांनी गॅझेट फाडून हवेत भिरकावले, खुर्च्या उचलण्याचा प्रयत्न; MLA वीरेश बोरकरांना काढले सभागृहातून बाहेर

eSakal No 1: ई-सकाळचा करिष्मा कायम! 21.2 दशलक्ष वाचकांसह पुन्हा 'नंबर वन'

Video: चोरट्याची फजिती! स्कूटी घसरली, हेल्मेट पडलं अन् स्वतःही पडला; सोशल मीडियावरील 'हा' व्हिडिओ एकदा बघाच

IND vs ENG 4th Test: ओल्ड ट्रॅफर्डवर जो रुटचा दबदबा, द्रविड-कॅलिसला मागे टाकून रचला इतिहास; नावावर केला 'हा' मोठा रेकॉर्ड

Goa Assembly: पोगो ठरावावरुन विधानसभेत राडा, सभापती संतापले, वीरेश बोरकरांना सभागृहातून काढले बाहेर; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT