Indian Football League Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Indian Football League: आघाडी घेतल्यानंतर धेंपो क्लब पराभूत, राजस्थान युनायटेडचा पिछाडीवरून 2-1 असा झुंझार विजय

Rajasthan United vs Dempo SC result: गुणतक्त्यातील सहाव्या क्रमांकासह धेंपो स्पोर्टस क्लबने स्पर्धेच्या विजेतेपद फेरीसाठी पात्रता मिळविली, पण त्यांना घरच्या मैदानावर सलग तिसरा सामना जिंकण्याची संधी हुकली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: धेंपो स्पोर्टस क्लबने सामन्याच्या पूर्वार्धात आघाडी घेतली, पण नंतर उत्तरार्धात दहा मिनिटांत दोन गोल करून राजस्थान युनायटेडने मुसंडी मारली आणि अखेरीस इंडियन फुटबॉल लीग (आयडब्ल्यूएल) स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील अखेरच्या लढतीत २-१ असा निसटता विजय मिळविला. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर रविवारी सामना झाला.

गुणतक्त्यातील सहाव्या क्रमांकासह धेंपो स्पोर्टस क्लबने स्पर्धेच्या विजेतेपद फेरीसाठी पात्रता मिळविली, पण त्यांना घरच्या मैदानावर सलग तिसरा सामना जिंकण्याची संधी हुकली. त्रिनिदाद-टोबॅगोचा मार्कुस जोसेफ याने २२व्या मिनिटास धेंपो स्पोर्टस क्लबला आघाडी मिळवून दिली, नंतर ४७व्या गेरार्ड आर्टिगस याने ४७व्या मिनिटास राजस्थान युनायटेडसाठी बरोबरीचा गोल केल्यानंतर थोमयो शिमरे याने ५७व्या मिनिटास पाहुण्या संघासाठी केलेला गोल निर्णायक ठरला.

राजस्थान युनायटेडचा हा नऊ सामन्यांतील पाचवा विजय ठरला. १७ गुणांसह ते तिसऱ्या स्थानी आले. धेंपो क्लबला चौथा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे नऊ लढतीतून नऊ गुणांसह ते सहाव्या क्रमांकावर कायम राहिले. ऐजॉल एफसीचे नऊ गुण झाले, पण मिझोराममधील संघाची गोलसरासरी (-९) कमी ठरली, तसेच त्यांच्याविरुद्ध धेंपो क्लबने विजय मिळविल्यामुळे त्यांना सातव्या क्रमांकावर राहावे लागले.

स्पर्धेतील अन्य एका सामन्यात रविवारी रियल काश्मीरने श्रीनिदी डेक्कनला २-० फरकाने हरविले. या निकालाचा श्रीनिदी डेक्कनच्या चौथ्या क्रमांकावर परिणाम झाला नाही, तर रियल काश्मीरने अखेरच्या दहाव्या क्रमांकावरून आठव्या क्रमांकावर उडी घेतली.

पहिल्या टप्प्यानंतर क्रमवारी

विजेतेपद फेरी ः डायमंड हार्बर (२२ गुण), शिलाँग लाजाँग एफसी (१७ गुण), राजस्थान युनायटेड (१७ गुण), श्रीनिदी डेक्कन (१५ गुण), चानमारी एफसी (११ गुण), धेंपो स्पोर्टस क्लब (९ गुण)

पदावनती फेरी ः ऐजॉल एफसी (९ गुण) रियल काश्मीर (८ गुण), गोकुळम केरळा (८ गुण), नामधारी एफसी (७ गुण)

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cockroach Janata Party: 'कॉकरोच जनता पार्टी' म्हणजे देश अस्थिर करणाऱ्यांची ‘बी-टीम’, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा पलटवार!

Chandra Gochar 2026: मानसिक शांतता आणि ऐश्वर्याचा मिलाफ! 5 राशींना मिळणार बँक बॅलन्स वाढवण्याची सुवर्णसंधी; महालक्ष्मीची कृपा

ICC Womens T20 Ranking: 12 महिन्यांचा प्रवास अन् ऐतिहासिक शिखर! भारताची 21 वर्षीय एन श्री चरणी बनली जगातील नंबर-1 टी-20 गोलंदाज

Benjamin Netanyahu vs Donald Trump: ट्रम्प यांना त्यांच्याच भाषेत उत्तर! 'आम्ही कोणाच्या इशाऱ्यावर चालत नाही'; नेतन्याहूंचा थेट पलटवार VIDEO

दोन महिन्यांचं लिव्ह-इन रिलेशनशिप अन् 3 खून! बॉयफ्रेंडच्या मदतीनं तरुणीनं आई-वडिल अन् लहान बहिणीचा काढला काटा; बंगळुरु हादरलं

SCROLL FOR NEXT