Quinton de Kock Dainik Gomantal
गोंयचें खेळामळ

IND vs SA: क्विंटन डी कॉकचा मोठा धमाका! खेळली वादळी खेळी, पण शतक हुकले; भारतीय गोलंदाजांची घेतली शाळा

Quinton de Kock Record: डी कॉकने या सामन्यात 90 धावांची तडाखेबंद खेळी खेळली. मात्र तो शतक पूर्ण करु शकला नाही.

Manish Jadhav

Quinton de Kock Record: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा स्टार सलामीवीर क्विंटन डी कॉकने गर्दा केला. न्यू चंदीगढच्या मुल्लांपुर स्टेडियमवर त्याने तूफानी फलंदाजी केली. डी कॉकने या सामन्यात 90 धावांची तडाखेबंद खेळी खेळली. मात्र तो शतक पूर्ण करु शकला नाही. यादरम्यान त्याने एक मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला.

अशी कामगिरी करणारा पहिला आफ्रिकी फलंदाज

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताच्या विरोधात 5 वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा करणारा पहिला दक्षिण आफ्रिकी क्रिकेटपटू म्हणून क्विंटन डी कॉकने विक्रम नोंदवला. क्रिकेट विश्वात केवळ इंग्लंडचा जोस बटलर आणि वेस्ट इंडिजचा निकोलस पूरन यांनीच भारताविरुद्ध 5 वेळा 50 प्लस धावांची खेळी खेळली आणि आता या यादीत डी कॉकचा समावेश झाला.

डी कॉकने केवळ 46 चेंडूंमध्ये 90 धावांची धडाकेबाज खेळी साकारली. या खेळीत त्याने 5 चौकार आणि 7 गगनचुंबी षटकार लगावले. या खेळीदरम्यान त्याचा स्ट्राइक रेट 195.65 इतका जबरदस्त होता. डी कॉकचे दुसरे टी-20 आंतरराष्ट्रीय शतक अवघ्या 10 धावांनी हुकले, पण भारताविरुद्ध 5 अर्धशतके ठोकणारा तो पहिला दक्षिण आफ्रिकी खेळाडू ठरला.

दक्षिण आफ्रिकेकडून तिसरी मोठी खेळी

या 90 धावांच्या खेळीमुळे क्विंटन डी कॉक हा दक्षिण आफ्रिकेसाठी भारताविरुद्ध टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील तिसरी सर्वात मोठी खेळी खेळणारा फलंदाज बनला. यापूर्वी, भारताविरुद्ध दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वात मोठा स्कोर डेव्हिड मिलरने 2022 मध्ये गुवाहाटी येथे नाबाद 106 धावा करुन केला होता. त्याचवर्षी इंदूर येथे राइली रुसो याने नाबाद 100 धावा केल्या होत्या. आता 90 धावांच्या खेळीसह क्विंटन डी कॉक या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आला.

IPL ऑक्शन 2026 पूर्वी धमाका

डावखुरा फलंदाज क्विंटन डी कॉकने काही महिन्यांपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, मात्र आता त्याने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन केले आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये परतल्यानंतर त्याने लगेचच भारताविरुद्ध अशी धमाकेदार खेळी खेळली.

आयपीएल 2026 च्या लिलावापूर्वी डी कॉकने केलेली ही दमदार कामगिरी त्याच्यासाठी खूप फायद्याची ठरु शकते. 16 डिसेंबर रोजी होणाऱ्या या लिलावात त्याला मोठी बोली लागण्याची शक्यता आहे. डी कॉकने स्वतःला एक कोटी रुपयांच्या बेस प्राईसमध्ये नोंदणीकृत केले आहे. विशेष म्हणजे, सुरुवातीला त्याचे नाव लिलावाच्या यादीत नव्हते, परंतु अनेक फ्रँचायझींच्या मागणीनंतर त्याचे नाव अंतिम यादीत समाविष्ट करण्यात आले. भारताविरुद्धच्या या महत्त्वपूर्ण खेळीमुळे डी कॉक आयपीएल लिलावात केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मीन राशीला शनीचा दणका! 40 दिवस 'अस्त', 138 दिवस 'वक्री' राहून कोणत्या राशींचे उघडले भाग्याचे दरवाजे?

गोव्यात निवडणुकीच्या तयारीला वेग! 91 टक्क्यांहून अधिक मतदारांची गणना पूर्ण; सीईओ संजय गोयल यांचा खुलासा

'शार्क टँक'ची Namita Thapar गोव्यात! ''12 तासांच्या शूटिंगमधून सुटका'' म्हणत शेअर केले फोटोज; व्हेकेशन लूक होतोय Viral

Goa voters missing: गोव्यातील एक लाख 78 हजार मतदार गहाळ; 10 लाख 84 हजार 956 मतदारांची नोंद

Illegal club Goa: वागातोरमधील प्रसिद्ध 'कॅफे CO2' चे शटर डाऊन! 250 आसनक्षमतेचा क्लब बेकायदेशीर

SCROLL FOR NEXT