IND vs SA: अर्शदीप सिंहनं टाकलं 13 चेंडूंचं षटक! टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नावावर केला लाजिरवाणा रेकॉर्ड

Arshdeep Singh Recod: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना सध्या न्यू चंदीगढच्या मुल्लांपुर स्टेडियममध्ये खेळला जात आहे.
Arshdeep Singh Recod
Arshdeep SinghDainik Gomantak
Published on
Updated on

Arshdeep Singh Recod: भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील दुसरा सामना सध्या न्यू चंदीगढच्या मुल्लांपुर स्टेडियममध्ये खेळला जात आहे. कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, मात्र भारतीय गोलंदाज तो निर्णय यशस्वी करु शकले नाहीत.

या सामन्यात भारताचा (India) वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंहने खूपच निराशाजनक प्रदर्शन केले. त्याने आपल्या एका षटकात (Over) तब्बल 13 चेंडू टाकून एक नकोसा विक्रम आपल्या नावावर केला. या खराब कामगिरीमुळे तो टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एका षटकात सर्वाधिक चेंडू टाकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सामील झाला.

Arshdeep Singh Recod
IND vs SA: 'जस्सी जैसा कोई नहीं!' बुमराहने 'शतक' ठोकून रचला इतिहास, अशी कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज! VIDEO

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या (South Afirca) दुसऱ्या टी-20 सामन्यात अर्शदीप सिंहला पहिल्या 6 षटकांमध्ये 2 षटके गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. या 2 षटकांत त्याने 20 धावा दिल्या, पण त्याला एकही विकेट घेता आला नाही. यानंतर कर्णधार सूर्याने त्याला 11व्या षटकात पुन्हा गोलंदाजीसाठी आणले. हे षटक अर्शदीपसाठी वाईट स्वप्न ठरले. या षटकात त्याची गोलंदाजीची लय पूर्णपणे बिघडली. त्याने एकाच षटकात तब्बल 7 'वाइड' चेंडू टाकले. नियमानुसार 6 वैध चेंडू टाकण्यासाठी अर्शदीपला एकूण 13 चेंडू टाकावे लागले. या 13 चेंडूंच्या षटकात अर्शदीपने एकूण 18 धावा दिल्या.

Arshdeep Singh Recod
IND vs SA T20: तिलक वर्मानं लगावला 89 मीटरचा गगनचुंबी षटकार, चेंडू थेट स्टेडियमच्या बाहेर; व्हिडिओ पाहून क्रिकेटप्रेमी थक्क!

जागतिक बरोबरी

या खराब कामगिरीमुळे अर्शदीप सिंह आता एका अशा यादीचा भाग बनला, ज्यात कोणताही गोलंदाज आपले नाव पाहू इच्छित नाही. अर्शदीप आता टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून एका षटकात सर्वाधिक चेंडू टाकणारा गोलंदाज बनला. विशेष म्हणजे, अर्शदीपने या वाईट विक्रमात अफगाणिस्तानच्या नवीन उल हकचीही बरोबरी केली. हकने 2024 मध्ये झिम्बाब्वेविरुद्धच्या एका टी-20 सामन्यात एका षटकात 13 चेंडू टाकले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com