Purvi Naik Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

National Swimming Championship: पूर्वीचा वेगवान 'चौकार'; सुवर्णपदकाची कमाई

Purvi Naik: ५० मीटर फ्रीस्टाईल शर्यत ३०.७० सेकंदात पूर्ण करून सुवर्णपदकाची कमाई केली

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: गोव्याची प्रतिभाशाली युवा जलतरणपटू पूर्वी नाईक राष्ट्रीय सबज्युनियर-ज्युनियर जलतरण स्पर्धेत मुलींच्या गट तीनमधील वेगवान जलतरणपटू ठरली. तिने ५० मीटर फ्रीस्टाईल शर्यत ३०.७० सेकंदात पूर्ण करून सुवर्णपदकाची कमाई केली. स्पर्धा ओडिशातील भुवनेश्वर येथे सुरू आहे.

पूर्वी हिचे हे स्पर्धेतील चौथे पदक ठरले. यापूर्वी तिने १०० मीटर फ्रीस्टाईल व ४०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये रौप्य, तर २०० मीटर फ्रीस्टाईलमध्ये ब्राँझपदक जिंकले होते. पूर्वी ही कांपाल-पणजी येथील खेलो इंडिया राज्य उत्कृष्टता केंद्रातील जलतरण प्रशिक्षणार्थी आहे. तिला प्रशिक्षक टी. ए. सुजित यांचे मार्गदर्शन लाभत असून ती कुजिरा येथील मुष्टिफंड हायस्कूलची विद्यार्थिनी आहे.

पूर्वी हिने शुक्रवारी सकाळच्या सत्रात ५० मीटर फ्रीस्टाईलच्या पात्रता फेरीत ३०.९२ सेकंदासह अव्वल वेळ नोंदविली होती. मुख्य फेरीतही तिने तोच धडाका कायम राखताना आपलीच अगोदरची वेळ ०.२२ सेकंद फरकाने मागे टाकत सुवर्णपदकावर हक्क सांगितला.

कर्नाटकच्या दोन्ही जलतरणपटू तिच्या मागे राहिल्या. श्विटी सुवर्णा (३१.०८ सेकंद) हिला रौप्य, तर श्रेया पुजार हिला (३१.२८ सेकंद) हिला ब्राँझपदक मिळाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Congress: विधानसभा तिकीटासाठी 4 कोटींची बोली? खर्गेंच्या हॉटेल बिलावरूनही ग्रासियस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप

AC Compressor Blast: पाकिस्तान हादरलं! रुग्णालयात एसी कॉम्प्रेसरचा भीषण स्फोट, 15 नवजात बालकांचा होरपळून मृत्यू; पालकांचा काळीज पिळवटणारा आक्रोश VIDEO

खरी कुजबुज: धो धो आश्वासने!

Goa Crime: 'त्या' नराधम बापाला कोर्टाचा मोठा दणका! अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी ठोठावली 20 वर्षांची शिक्षा; 1.30 लाखांचा दंड

Telangana Accident: किंकाळ्या अन् आक्रोश! अनियंत्रित बसची कंटेनरला जोरदार धडक, 6 ठार, 20 जखमी; तेलंगणात भीषण अपघात

SCROLL FOR NEXT