Sporting Club Vs FC Goa  Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Professional League 2024: स्पोर्टिंग क्लबचा एफसी गोवाला धक्का! स्पर्धेतील सलग तिसरा विजय

Professional Football League 2024: गतविजेत्या स्पोर्टिंग क्लब द गोवाने प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. त्यांनी एका गोलच्या पिछाडीवरून एफसी गोवा संघाला २-१ फरकाने नमविले.

गोमन्तक डिजिटल टीम

Professional League 2024 Sporting Club Vs FC Goa

पणजी: गतविजेत्या स्पोर्टिंग क्लब द गोवाने प्रोफेशनल लीग फुटबॉल स्पर्धेत गुरुवारी सलग तिसऱ्या विजयाची नोंद केली. त्यांनी एका गोलच्या पिछाडीवरून एफसी गोवा संघाला २-१ फरकाने नमविले.

सामना म्हापसा येथील धुळेर स्टेडियमवर झाला. सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटास लेम्मेत तांगवा याने एफसी गोवास आघाडी मिळवून दिली. ४५व्या मिनिटास सेल्विन मिरांडा याने केलेल्या गोलमुळे स्पोर्टिंग क्लबने बरोबरी साधली.

उत्तरार्धाच्या सुरवातीस बदली खेळाडू या नात्याने मैदानात आलेल्या डॉयल अल्विस याच्या गोलमुळे ५८व्या मिनिटास स्पोर्टिंगच्या खाती महत्त्वपूर्ण आघाडी जमा झाली.

स्पर्धेत ओळीने तिसरा सामना जिंकल्यामुळे स्पोर्टिंग क्लबचे आता नऊ गुण झाले आहेत. एफसी गोवास दुसरा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे चार लढतीनंतर त्यांचे सहा गुण कायम राहिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांनी गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

Goa Today's News Live: नैसर्गिक मृत्यू की हत्या; पारोडा-केपे येथे घरात आढळला महिलेचा मृतदेह

Goa Cyber Crime: गोवा पोलिसांनी दिला दणका, सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल 152 मोबाईल नंबर 'ब्लॉक'

SCROLL FOR NEXT