odisha fc roy krishna|Bhausaheb Bandodkar Trophy Dainik Gomantak
गोंयचें खेळामळ

Bandodkar Football Trophy: ओडिशा एफसी सलग तिसऱ्या विजयासह अव्वल स्थानी! चर्चिल ब्रदर्सचा उडवला धुव्वा

Bhausaheb Bandodkar Memorial Trophy: पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर शनिवारी झालेल्या लढतीत रॉय कृष्णाने याने शानदार हॅटट्रिक नोंदविली

गोमन्तक डिजिटल टीम

पणजी: ओडिशा एफसीने त्यांच्या स्थापनादिनी धडाकेबाज कामगिरी नोंदविताना भाऊसाहेब बांदोडकर मेमोरियल ट्रॉफी फुटबॉल स्पर्धेत चर्चिल ब्रदर्सचा ६-० फरकाने धुव्वा उडविला. फातोर्डा येथील पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर शनिवारी झालेल्या लढतीत रॉय कृष्णाने याने शानदार हॅटट्रिक नोंदविली.

ओडिशा एफसीने सलग तिसऱ्या विजयासह ब गटात अव्वल स्थान मिळविले. उपांत्य फेरीत आता त्यांच्यासमोर अ गट उपविजेत्या ब्रिस्बेन रोअर संघाचे आव्हान असेल. चर्चिल ब्रदर्सला सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले. ओडिशाच्या एकतर्फी विजयात रॉय कृष्णा याने अनुक्रमे २१, ३० व ३६व्या मिनिटास गोल केला. नंतर ४३व्या मिनिटास आफाओबा सिंग याने केलेल्या गोलमुळे विश्रांतीला भुवनेश्वर येथील संघ ४-० फरकाने आघाडीवर होता. अखेरच्या टप्प्यात माविहमिंगथांगा याने अनुक्रमे ८६ व ९०व्या मिनिटास गोल नोंदवून ओडिशाच्या स्पर्धेतील मोठ्या विजयावर शिक्कामोर्तब केले.

डिफेन्सा जस्टिसिया उपांत्य फेरीत

अर्जेंटिनातील क्लब दिपोर्तिव्हो डिफेन्सा जस्टिसियाने चेन्नईयीन एफसीवर २-० फरकाने विजय नोंदविला आणि उपांत्य फेरीत प्रवेश केला. बोहिलर मिर्को व वाल्देझ फ्रान्को यांनी प्रत्येकी एक गोल केला. दुसऱ्या यलो कार्डमुळे उत्तरार्धात दोघांना रेड कार्ड मिळाल्यामुळे डिफेन्सा जस्टिसियाला नऊ खेळाडूंसह खेळावे लागले. दुसऱ्या विजयासह त्यांचे सहा गुण झाले व गटात दुसरा क्रमांक मिळाला. उपांत्य फेरीत ते अ गट विजेत्या एफसी गोवाविरुद्ध खेळतील. चेन्नईयीनचे दुसऱ्या पराभवामुळे तीन गुणांसह आव्हान संपुष्टात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

India Bike Week 2024: चित्तथरारक स्टंट, म्युझिक आणि बरंच काही...; गोव्यातील बाईक इव्हेंटच्या Date, Venue जाणून घ्या

Tribute to the Legends मिरामार किनारी सुदर्शन पटनाईक यांनी साकारले सिने जगतातील दिग्गजांचे Sand Art, पाहा फोटो

SCROLL FOR NEXT